उन्हाळ्याच्या सुट्टी निमित्ताने गावी आणि सहलीसाठी जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे खात्याकडून विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. दोन-तीन दिवसापूर्वीच रेल्वे खात्याकडून उन्हाळी सुट्टीपुरता देशभरातल्या आठ मार्गावरून 217 विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. या खुशखबरीनंतर रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिलीये ती म्हणजे व्हिस्टाडोम कोचची.
Table of contents [Show]
कोणत्या एक्स्प्रेसला मिळणार वाढीव विस्टाडोम कोच
मुंबई-गोवा मार्गावरील मडगाव तेजस एक्स्प्रेसला उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने आणखी एक विस्टाडोमचा कोच मिळणार आहे. यामुळे आता मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये दोन विस्टाडोम कोच असणार आहेत. सुट्टीचा मौसम असल्याने सहलीसाठी अनेक पर्यटक बाहेर पडत आहेत. विस्टाडोम कोच सारख्या सुविधेचा अनुभव घेण्यासाठी अनेक प्रवाशी इच्छुक आहेत. त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मडगाव तेजस एक्स्प्रेमध्ये आणखी एक विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कोचसाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग केली आहे. त्यामुळे वेटिंग लिस्ट पाहुनच प्रवास करण्याचा सल्ला मध्य रेल्वेच्या झोनल अधिकाऱ्यांने प्रवाशांना दिला आहे.
काय आहे विस्टाडोम कोच
रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे विभागात नेहमीच नावीन्यपूर्ण बदल करत केले आहेत. अत्याधुनिक गाड्या, सर्व सोई-सुविधा संपन्न अशा गाड्या प्रवाशांच्या सेवेत रेल्वेने दिल्या आहेत. तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत ट्रेन हे याच बदलत्या रेल्वे सेवेचं प्रतिबिंब आहे.
यासोबतच रेल्वे पर्यटन ही नवीन संकल्पना उदयास आणत लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास हा कंटाळवाना न करता तो अधिक प्रसन्नशील असावा या उद्देशाने रेल्वेने विस्टाडोम कोचची निर्मिती केली आहे. देशभरातल्या एकुण 14 लांब पल्ल्याच्या ट्रेनला विस्टाडोम कोच लावले आहेत. या कोचला तिन्ही बाजुंनी काचेचे आच्छादन असते. त्यामुळे प्रवाशांना बाहेरचं दृष्य पाहत प्रवासाचा आनंद लुटता येतो. हा अनुभव घेण्यासाठी अनेक प्रवासी विस्टाडोम कोचचं बुकिंग करुन प्रवास करत आहेत. थोडक्यात रेल्वेच्या या प्रयोगाला प्रवाशांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.
विस्टाडोम कोचची रचना
विस्टाडोम कोच हा सुपर आरामदायी कोच आहे. या कोचमधल्या खुर्च्या या कारच्या खुर्च्या सारख्या अतिशय आरामदायी आणि मूव्हींग चेअर सारख्या आहेत. दोन खुर्च्यामध्ये भरपूर स्पेस दिलेली आहे. या कोचमधले शौचालय हे सर्व सुविधांनी संपन्न असून फ्रीज, मायक्रोव्हेव ओव्हन सह कॉफी मेकर मशीन सह एक किचन एरिया सुद्धा तयार करण्यात आली आहे. यासोबतच सीसीटिव्ही कॅमेरा आणि सेंसरचे दरवाजे सुद्धा आहेत.
विस्टाडोम कोचचं बुकिंग आणि तिकीट दर
विस्टाडोम कोचचं बुकिंग हे इतर तिकीटसारखं IRCTC च्या मुख्य संकेतस्थळावरूनच करता येतं. या कोचचे दर हे सामान्य कोचच्या दरापेक्षा जास्त असतात. शताब्दी एक्स्प्रेसच्या एक्झिक्यूटिव्ह कोचच्या दरा एवढा दर हा विस्टाडोम कोचचा असतो. यामध्ये जेवनाचा दर समाविष्ट केलेला नाहीये. मूळ दरावर मग रिजर्वेशन चार्ज आणि जीएसटी वा अन्य कर लावले जातात. जर तिकीट रद्द करायचं असेल तर इतर तिकीटांसाठी जे नियम आहेत तेच नियम लागू होतात.
Source : https://bit.ly/3UAJAyW