Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

PM Care donors : पेट्रोल आणि गॅस कंपन्यांच्या देणग्यांची कमाल, पीएम केअरमध्ये जमा झाले 2900 कोटी!

PM Care donors : कोविडकाळात गरजू नागरिकांना मदत व्हावी, म्हणून केंद्र सरकारतर्फे पीएम केअर फंडाची निर्मिती करण्यात आली होती. या निधीत मागच्या काही काळात 2900 कोटींहून अधिक रक्कम जमा झालीय. विशेष म्हणजे सरकारी कंपन्यांनी मोठं योगदान यात दिलंय.

Read More

Foreign Travelling : भारतीयांनी परदेशी प्रवासावर खर्च केले 12.51 बिलीयन डॉलर, काय सांगतो आरबीआयचा अहवाल

Foreign Travelling : कोरोना काळ सरताच भारतीय प्रवाशांनी परदेशी प्रवासावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. आरबीआयच्या LRS (Liberalized Remittances Scheme) अहवालामधुन ही बाब निदर्शनास आली आहे. आरबीआयच्या माध्यमातून बाहेर पाठवण्यात आलेल्या एकुण फंडपैकी 52 टक्के फंड हा केवळ पर्यटनासाठी देण्यात आला आहे.

Read More

iPhone 14: 'या' वेबसाईटवर फक्त 40 हजारात खरेदी करता येणार iPhone 14; कसा ते घ्या जाणून घ्या!

Discount on iPhone 14: अनेकांना आयफोन (iPhone) खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र त्याची किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य लोकांना तो सहज खरेदी करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही 'iPhone 14' केवळ 40 हजारापर्यंत खरेदी करू शकता. कसा ते पाहुया.

Read More

Bank Recurring Deposit: 'या' बँका आरडीवर देत आहेत 7.60 टक्क्यांपर्यंत व्याजदर

Bank Recurring Deposit: आरडी (Recurring Deposit-RD) हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणूकदार मासिक स्वरूपात ठराविक रक्कम गुंतवून चांगला परतावा मिळवू शकतो. आरबीआयने रेपो रेट (Repo Rate) वाढवल्यानंतर अनेक बँकांनी आरडीवरील व्याजदर वाढवले आहेत.

Read More

IPL 2023: अर्शदीप सिंगच्या बॉलिंगचा IPLला झटका; स्टम्प ब्रेक झाल्याने लाखोंचे नुकसान

IPL 2023: मुंबई विरुद्ध पंजाब या आयपीएल सामन्यात पंजाबच्या टीमचा खेळाडू अर्शदीप सिंग याने वेगवान यॉर्कर गोलंदाजी करून एकाच ओव्हरमध्ये दोनदा स्टम्पचे तुकडे केले. सध्या क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलईडी स्टम्प आणि बेल्सच्या सेटची किंमत सुमारे 40,000 ते 50,000 डॉलर्स म्हणजे सुमारे 32 ते 41 लाख रुपये इतकी आहे.

Read More

Axis Bank FD Rate Hikes: अ‍ॅक्सिस बँकेकडून एफडीच्या व्याजदरात वाढ; सर्वाधिक व्याज 7.95 टक्के

Axis Bank FD Rate Hikes: भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील (Fixed Deposit-FD) व्याजदरात 5 बेसिस पॉईंटने वाढ केली. बँकेकडून ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर 3 ते 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर 7.95% व्याजदर देण्यात येत आहे.

Read More

Sachin Tendulkar Birthday: कोट्यवधींच्या घरात राहतो क्रिकेटचा बादशाह, निवृत्तीनंतरही भरघोस कमाई

Sachin Tendulkar Networth: क्रिकेटप्रेमींमध्ये क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. तो आज 50 वर्षांचा झाला. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अनेक मोठे विक्रम करण्यासोबतच भरपूर कमाईही केली आहे. आता निवृत्तीनंतरही तो दरमहा कोट्यवधींची कमाई करत असून त्याची नेटवर्थ किती आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

First Water Metro of India : भारतात सुरू होणार पहिली वॉटर मेट्रो, काय असणार तिकीटांचे दर

First Water Metro of India : जलमार्ग विकासा अंतर्गतच देशामध्ये पहिली वॉटर मेट्रो सुरू केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 25 एप्रिल रोजी या वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकल्पाला केरळ राज्याचा ड्रीम प्रॉजेक्ट म्हणून संबोधले आहे.

Read More

Aditya-Birla Group ने मुंबईत खरेदी केला 220 कोटीचा बंगला, दुबाश कुटुंबियांनी चॅरिटेबल ट्रस्टसाठी विकला बंगला

Aditya-Birla Groupच्या BGH प्रॉपर्टीने मुंबईतमध्ये 220 कोटी रूपयाचा बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याच्या स्टॅम्प ड्युटीसाठी बिर्ला ग्रुपने तब्बल 13.20 कोटी रूपये मोजले आहेत. हा बंगला दुबाश या पारसी कुटुंबियांचा असून एर्नेवाझ दुबाश यांनी स्थापन केलेल्या चॅरिटेबल ट्रस्टसाठी या बंगल्यांची विक्री करण्यात आली आहे.

Read More

Common Service Centres: स्टेट बँक कॉमन सर्व्हिस सेंटरवर आय स्कॅनर बसवणार; वयोवृद्ध नागरिकांना फायदा

स्टेट बँक ऑफ इंडिया दुर्गम भागातील बँकिंग सर्व्हिस पॉइंटवर (CSP Bank Mitra) आय स्कॅनर बसवण्याचा विचार करत आहे. वृद्ध नागरिकांच्या बोटांचे ठसे घेण्यात अडचणी येत असल्याने आता डोळ्यांच्या स्कॅनद्वारे खातेधारकाची ओळख पटवण्यात येईल. या सुविधेचा वयोवृद्ध नागरिकांना फायदा होईल. दुर्गम भागातील वृद्ध नागरिकांना पायपीट करत शाखेत जाण्याचा त्रास या सुविधेमुळे कमी होण्यास मदत होईल.

Read More

G-20 Leader Summit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सप्टेंबर महिन्यात भारतात, पंतप्रधान मोदी-बायडेन होणार चर्चा

G-20 Leader Summit: चीन आणि रशियाच्या हरकतींनी हैराण झालेल्या अमेरिकेने भारतासोबत द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दोन्ही देशांमधील महत्वाच्या निर्णयांना येत्या सप्टेंबर महिन्यात अंतिम स्वरुप मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जी-20 लिडरशीप समिटसाठी उपस्थित राहणार आहेत.

Read More

Deloitte Layoffs: आर्थिक मंदीच्या फटक्यामुळे डिलॉईटची अमेरिकेत 1200 कर्मचारी कपातीची घोषणा

Deloitte Layoffs: डिलॉईट कंपनीने अमेरिकेत 1200 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. व्यावसायिक ऑडिट फर्म म्हणून कम करणाऱ्या या कंपनीला जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक मंदीचा फटका बसला आहे.

Read More