Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 14: 'या' वेबसाईटवर फक्त 40 हजारात खरेदी करता येणार iPhone 14; कसा ते घ्या जाणून घ्या!

Discount on iPhone 14

Image Source : www.dxomark.com

Discount on iPhone 14: अनेकांना आयफोन (iPhone) खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र त्याची किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य लोकांना तो सहज खरेदी करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही 'iPhone 14' केवळ 40 हजारापर्यंत खरेदी करू शकता. कसा ते पाहुया.

सध्या भारतातील दिल्ली आणि मुंबई शहरांमध्ये अ‍ॅपल स्टोअर (Apple stores) सुरु करण्यात आले आहेत. या स्टोअरमधून ग्राहकांना थेट वस्तूची खरेदी करता येईल, सोबतच वेगवेगळ्या सेवांचा लाभ घेता येईल. अनेकांना आयफोन खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र त्याची किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य लोकांना तो सहज खरेदी करता येत नाही.

जोपर्यंत मार्केटमध्ये आयफोन 15 येत नाही. तोपर्यंत आयफोन 14 (iPhone 14)चीच चलती असणार आहे. तर हा iPhone 14 तुम्हाला फक्त 40 हजार रुपयांत खरेदी करता आला तर? होय हे शक्य आहे. ऑनलाईन रिटेल वेबसाईट अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टच्या (Flipkart) माध्यमातून तुम्हाला iPhone 14 फक्त 40 हजारांत खरेदी करता येणार आहे. तो कसा करायचा, याबाबत अधिक जाणून घेऊ.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मिळतोय एक्सचेंज डिस्काउंट

सध्या अ‍ॅपल स्टोअरमध्ये ग्राहकांना iPhone 14 खरेदी करण्यासाठी 79,990 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र ऑनलाईन रिटेल वेबसाईट अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर या फोनची किंमत 71,799 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर जुने फोन एक्सचेंज करू शकतात. हीच सुविधा ग्राहकांना वेबसाईटवर आणि अ‍ॅपल स्टोअरमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. या सुविधेचा लाभ घेऊन कमी किमतीत ग्राहक आयफोन खरेदी करू शकतात. सध्या अ‍ॅमेझॉनवर आयफोन एक्सचेंज (iPhone Exchange Offer) अंतर्गत 22,700 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. तर फ्लिपकार्टवर 29,250 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. याचा लाभ घेऊन ग्राहक आयफोन कमी किमतीत खरेदी करू शकतात. तुमच्या आयफोनच्या मॉडेलनुसार आणि कंडिशननुसार डिस्काउंट कमी जास्त केला जाऊ शकतो.

इतका मिळेल डिस्काउंट

सध्या ऑनलाईन रिटेल वेबसाईट अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर iPhone 14 च्या खरेदीवर ग्राहकांना डिस्काउंट मिळत आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Credit Card Offer) हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 4,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा डिस्काउंट अधिक 22,700 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट पकडून ग्राहकांना एकूण 26,700 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनवर ग्राहकांना iPhone 14 हा 45,299 रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकतो.

फ्लिपकार्टवर देखील ग्राहकांना डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Credit Card Offer) हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 4,000 रुपयांचा डिस्काउंट त्वरित देण्यात येईल. याशिवाय फ्लिपकार्टवर 29,250 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट ही देण्यात येतोय. हे दोन्ही डिस्काउंट मिळून ग्राहकांना 33,250 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. हा डिस्काउंट मिळाल्यानंतर ग्राहकांना iPhone 14, हा फक्त 38,749 रुपयांना खरेदी करता येईल.

Source: hindi.moneycontrol.com