गेल्या वर्षभरापासून जगभरातील अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आता ऑडिट फर्म कंपनी डेलॉइटचे नावही यात जोडले गेले आहे. फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालानुसार, कंपनीने एकूण कर्मचाऱ्यांपैकी 1.5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना आखली आहे. यानुसार कंपनी एकूण 1,200 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. ही कर्मचारी कपात अमेरिकेत केली जाणार आहे.
संचालकांचे कंपनीतील मंदीबद्दल मौन
डेलॉइटचे व्यवस्थापकीय संचालक जोनाथन गँडल यांनी एका ईमेलमध्ये म्हटले आहे की, ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे युएसमधील व्यवसायात वाढ होत आहे. Deloitte च्या वार्षिक अहवालानुसार, US मधील कर्मचारी संख्या 2021 मध्ये 65,000 वरून गेल्या वर्षी 80,000 पर्यंत वाढली आहे. डेलॉइटचे कंपनीने 2022 मध्ये एका प्रकल्पातून 59.3 अब्ज डॉलर इतकी कमाई केली. पण हे सांगताना कंपनीने आर्थिक मंदीबद्दल बोलणे टाळले आहे.
Deloitte व्यतिरिक्त, KPMG ने फेब्रुवारी महिन्यात घोषणा केली होती की, ते युएसमधील त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2 टक्क्यांनी कमी करणार आहे. त्याचप्रमाणे Accenture कंपनीने देखील आपल्या 2.5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे.
Ernst & Young कंपनीचा कर्मचारी कपातीचा निर्णय
अर्न्स्ट आणि यंग या कंपनीने अलीकडेच आपल्या 3,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 5% ही कपात असणार आहे. याशिवाय फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे संकेत दिले आहेत. फेसबुक तसेच व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राममधील कर्मचाऱ्यांचा यात समावेश असेल. यापूर्वी, मनोरंजन उद्योगातील दिग्गज डिस्नेने देखील आपल्या एकूण कर्मचार्यांपैकी 15% म्हणजेच 7000 कर्मचार्यांना, कमी केले आहे.
Source: www.moneycontrolhindi.com