Foreign Travelling : एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 मध्ये भारतीयांनी परदेशी प्रवासावर एकुण 12.51 बिलीयन डॉलर खर्च केले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जाहिर करण्यात आलेल्या अहवालातून ही गोष्ट निदर्शनास आली आहे. गेल्या एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत यामध्ये 104 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
परदेशी प्रवासात का झाली वाढ
कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्ष जगभरातील व्यवहार ठप्प झालेले. सगळ्याच देशांकडून हवाई वाहतुक सुद्धा बंद करण्यात आलेली. मात्र, हा कोरोना काळ ओसरताच सर्व देशांनी हवाी वाहतुक सुरू केली. कोरोना काळामुळे आलेली आर्थिक मंदीतून बाहेर येण्यासाठी प्रत्येक देशांनी पर्यटन क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले. त्यात दोन वर्ष घरात राहिल्यावर प्रत्येकांस बाहेर फिरण्याची व पुन्हा एकदा तेच स्वातंत्र्य उपभोगण्याची इच्छा होती. या अशा कारणांमुळे हवाई वाहतुक सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटनाला पसंती देत परदेशी प्रवास केला आहे.
पर्यटनासोबतच आणखी महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे शिक्षण. आज उच्चशिक्षणाच्या निमित्ताने लाखो विद्यार्थी हे परदेशात जात आहेत. कोरोनामुळे अचानक निर्बंध लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना घरातूनच ऑनलाईन पद्धतीने परदेशातल्या विद्यापीठातून शिक्षण घ्यावं लागलं. मात्र, वाहतुकीचा मार्ग खुला झाल्यावर अनेक विद्यार्थी उच्चशिक्षण व नोकरीसाठी परदेशात प्रवास केला आहे.
जगभरातल्या जवळपास 240 देशांमध्ये भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करत आहेत. यामध्ये सर्वाधिक पसंती ही कॅनडा, यूके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांना दिली जाते. 2022 दरम्यान 7.5 लाख विद्यार्थी हे शिक्षणासाठी परदेशी गेले आहेत. कोरोना पूर्व काळाच्या तुलनेत हे यामध्ये 6 पटीने वाढ झाली आहे. 2017 मध्ये 4.5 लाख विद्यार्थ्यी, 2018 मध्ये 5.2 लाख, 2019 मध्ये 5.86 लाख तर 2020 मध्ये 2.6 लाख विद्यार्थी परदेशी गेले होते.
परदेशी प्रवासाचे वाढते प्रमाण
जानेवारी 2023 मध्ये भारतीयांनी परदेशी प्रवासावर 1.49 बिलीयन डॉलर खर्च केले. तर फेब्रुवारी 2023 मध्ये 1.07 बिलीयन डॉलर खर्च केले. फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत यामध्ये 9.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरबीआयकडून LRS अंतर्गत परदेशात जो पैसा पाठवला जातो त्यापैकी 52 टक्के पैसा हा पर्यटनाच्या उद्देशाने पाठवला गेला आहे.