Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sachin Tendulkar Birthday: कोट्यवधींच्या घरात राहतो क्रिकेटचा बादशाह, निवृत्तीनंतरही भरघोस कमाई

Sachin Tendulkar Birthday

Image Source : www.activenoon.com

Sachin Tendulkar Networth: क्रिकेटप्रेमींमध्ये क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. तो आज 50 वर्षांचा झाला. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अनेक मोठे विक्रम करण्यासोबतच भरपूर कमाईही केली आहे. आता निवृत्तीनंतरही तो दरमहा कोट्यवधींची कमाई करत असून त्याची नेटवर्थ किती आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी बॅट हातात धरून आंतराष्ट्रीय क्रिकेट विश्वात एकापाठोपाठ एक विक्रम रचणाऱ्या सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भरघोस कमाई केली आहे. मीडियामध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सध्या सचिन तेंडुलकरकडे 1463 कोटी रुपयांची एकूण  संपत्ती आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो जाहिराती आणि इतर माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.

ब्रँड एंडोर्समेंटमधून मूळ कमाई

भारतातील काही मोठ्या ब्रँड्सनी एक लोकप्रिय चेहरा म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली आहे. यात बूस्ट, ल्युमिनस इंडिया, सनफिस्ट, कॅस्ट्रॉल इंडिया, बीएमडब्ल्यू, ल्युमिनस इंडिया, सनफिस्ट, एमआरएफ टायर्स, अविवा इन्शुरन्स, पेप्सी, आदिदास, व्हिसा, ल्युमिनस, सान्यो, बीपीएल, फिलिप्स, स्पिनी यासारख्या दिग्गज ब्रँड्सचा समावेश आहे. तसेच विदेशी कार निर्माता ब्रँड बीएमडब्ल्यूने कंपनीचा देशातील ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय जिओ सिनेमाने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, एमएस धोनी आणि स्मृती मानधना तसेच सचिन तेंडुलकर यांना आपला आपल्या जाहिरातींचा भाग बनवले आहे.

सचिनकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन 

Sachin Tendulkar car collections सचिन तेंडुलकर याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक आलिशान गाड्या आहेत.  यामध्ये BMW i8, BMW 7 Series, 750Li M Sport, Nissan GT-R, Audi Q7, BMW M6 Gran Coupe आणि BMW M5 30 Jahre आदी कार्सचा समावेश आहे.

मुंबईसह केरळ मध्ये कोट्यवधींचे घर

Sachin Tendulkar house

सचिन तेंडुलकरची आलिशान जीवनशैली पाहून त्याच्या घराच्या किमतीचाही अंदाज बांधता येतो. मुंबईतील अब्जाधिशांचे माहेर समजल्या जाणाऱ्या वांद्रे भागात सचिनचा एक आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार, 100 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. सचिनने हे घर 2007 मध्ये सुमारे 40 कोटी रुपयांना विकत घेतले होते. केवळ मुंबईच नाही तर केरळमध्येही त्याची मालमत्ता आहे. तसेच त्याचा मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक आलिशान फ्लॅटही आहे.

Source: www.jagran.com