Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Recurring Deposit: 'या' बँका आरडीवर देत आहेत 7.60 टक्क्यांपर्यंत व्याजदर

Bank Recurring Deposits

Bank Recurring Deposit: आरडी (Recurring Deposit-RD) हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणूकदार मासिक स्वरूपात ठराविक रक्कम गुंतवून चांगला परतावा मिळवू शकतो. आरबीआयने रेपो रेट (Repo Rate) वाढवल्यानंतर अनेक बँकांनी आरडीवरील व्याजदर वाढवले आहेत.

म्युच्युअल फंडमधील एसआयपी प्रमाणेच आवर्ती ठेव योजना म्हणजेच आरडी (Recurring Deposits)मध्ये प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करता येते. आरडी योजनेमध्ये गुंतवणूकदार मासिक स्वरूपात (Monthly Investment) ठराविक रक्कम गुंतवू शकतो. यावर निश्चित स्वरूपात व्याजदर मिळते. आवर्ती ठेव योजना सुरक्षित गुंतवणूक योजना मानली जाते. सध्याच्या घडीला अनेक बँका वेगवेगळे व्याजदर आरडीवर (RD) देत आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आरडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे.

आवर्ती ठेव योजनेमध्ये साधारणत: 1 ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. महत्त्वाचे म्हणजे आरडीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स आकारण्यात येतो. आरडीमध्ये गुंतवलेले पैसे आणि त्यातून मिळणारे व्याज अशा दोन्हीवर टॅक्स भरावा लागतो. सध्या आरडीवर कोणत्या बँका किती व्याजदर देत आहेत, ते जाणून घेऊयात.

आवर्ती ठेव योजनेवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank)

देशातील सर्वात मोठी खासगी बँक म्हणून ओळखली जाणारी अ‍ॅक्सिस बँक आरडीवर 5 वर्षाच्या गुंतवणुकीसाठी 7% व्याजदर देत आहे. जर गुंतवणूकदाराने 5,000 रुपये मासिक स्वरूपात 5 वर्षासाठी गुंतवले, तर त्याला मॅच्युरिटीवेळी 3.60 लाख रुपये मिळतील.

डीसीबी बँक (DCB Bank)

खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये डीसीबी बँक ही आरडीवर सर्वाधिक व्याज देणारी बॅंक आहे. यातील 5 वर्षाच्या गुंतवणुकीसाठी 7.60 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. डीसीबी बँकेच्या आरडीमध्ये तुम्ही 5,000 रुपये महिना गुंतवल्यानंतर 5 वर्षानंतर तुम्हाला 3. 66 लाख रुपये मिळतील.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank)

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि यु स्मॉल फायनान्स बँक 5 वर्षांच्या आरडीवर 7.20% व्याजदर देत आहे. यामध्ये गुंतवणूकदाराने प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये गुंतवल्यानंतर त्याला 5 वर्षानंतर 3.62 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल.

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank)

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सतत ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत असते. सध्या ही बँक 5 वर्षाच्या कालावधीसाठी आरडीवर 7.5% व्याजदर देत आहे. या बँकेमधील आरडीमध्ये 5 वर्षासाठी 5,000 रुपये गुंतवले, तर कालावधी पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदाराला 3.65 लाख रुपये मिळतील.

इंडसइंड बँक (IndusInd Bank)

इंडसइंड बँक 5 वर्षासाठी आरडीमधील गुंतवणुकीवर 7.25 % व्याजदर देत आहे. यातील 5,000 रुपयांची 5 वर्षापर्यंतची गुंतवणूक गुंतवणूकदाराला 3.62 लाख रुपये मिळतील.  

Source: hindi.moneycontrol.com