भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी कर्जावरील व्याजासह, त्यांच्या एफडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅक्सिस बँकेने एफडीवरील व्याजदरात पुन्हा एकदा 5 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. या वाढीनंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकेने कमाल व्याजदर 7.2 % दिला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक व्याजदर 7.95% ठेवला आहे. यापूर्वी बँकेने मार्च 2023 मध्ये 0.40 % व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर आता बँकेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा एकदा मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना कमी कालावधीत चांगला परतावा मिळणार आहे. हे नवीन व्याजदर 21 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
Table of contents [Show]
किमान गुंतवणूक 5,000 रुपये
ग्राहकांनी जास्तीत जास्त अॅक्सिस बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. ग्राहकांना यामध्ये कमीतकमी 5,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येणार आहे. तर जास्तीत जास्त 2 कोटी रुपये गुंतवता येतील. बँकेकडून ग्राहकांना 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर 3 ते 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्यात येत आहे. याशिवाय 2 वर्ष ते 30 महिन्यांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ग्राहकांना 7.20% व्याजदर दिला जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वर्षाच्या गुंतवणुकीवर 7.95% व्याजदर देण्यात येत आहे.
7 ते 60 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4 टक्के व्याज
अॅक्सिस बँक 7 ते 45 दिवसांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 3.50 % व्याजदर देत आहे. तर 46 ते 60 दिवसांच्या आत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4 % दराने व्याजदर देत आहे.
3 महिने ते वर्षभराच्या एफडीवर एवढे व्याज मिळेल
अॅक्सिस बँक 61 दिवस ते 3 महिनांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4.50% व्याजदर देत आहे. तर 3 महिने ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी ग्राहकांना 4.75% व्याज देत आहे. याशिवाय 6 ते 9 महिन्यांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या मुदत ठेवींवर ग्राहकांना 5.75 % व्याजदर दिले जाणार आहे. तसेच 9 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ग्राहकांना 6 टक्के व्याज दिले जाणार आहे.
1 वर्षाच्या एफडीवरील व्याजदर जाणून घ्या
बँक 1 वर्ष ते 1 वर्ष 24 दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना 5 बेसिस पॉईंटने व्याजदर वाढवून देणार आहे. यावर ग्राहकांना 6.8 % व्याजदर मिळणार आहे. याशिवाय 1 वर्ष 25 दिवस ते 13 महिन्यांच्या एफडीवर ग्राहकांना 7.1 % व्याजदर देण्यात येत आहे.
10 वर्षाच्या एफडीवर इतके व्याजदर मिळणार
बँक ग्राहकांना 13 महिने ते 2 वर्षाच्या एफडीवर 7.15 % व्याजदर देत आहे. तर 2 वर्ष ते 30 महिन्यांच्या एफडीवर ग्राहकांना 7.2 % व्याजदर मिळणार आहे. याशिवाय 30 महिने ते 10 वर्षाच्या दीर्घ कालावधीसाठी बँक 7 % व्याजदर देत आहे.
Source: zeenews.india.com