Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

First Water Metro of India : भारतात सुरू होणार पहिली वॉटर मेट्रो, काय असणार तिकीटांचे दर

Kochi Water Metro

First Water Metro of India : जलमार्ग विकासा अंतर्गतच देशामध्ये पहिली वॉटर मेट्रो सुरू केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 25 एप्रिल रोजी या वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकल्पाला केरळ राज्याचा ड्रीम प्रॉजेक्ट म्हणून संबोधले आहे.

First Water Metro of India : देशाच्या आर्थिक विकासासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारकडून
पायाभूत सोई-सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर दिला जात आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग उभारणी, मुख्य औद्योगिक शहरांंमध्ये वाहतुकीसाठी मेट्रो, रस्ते, रेल्वे मार्गाचे सुसज्ज जाळे विस्तारणे, भूयारी मार्ग उभारणे असे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

या सर्व पायाभूत सुविधांमध्ये जल मार्गाचा सुद्धा प्रामुख्यांने विकास करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. या जलमार्ग विकासा अंतर्गतच देशामध्ये पहिली वॉटर मेट्रो सुरू केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 25 एप्रिल रोजी या वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.

पाहुयात देशातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या राज्यात सुरू होणार आहे, यासाठी आलेला खर्च आणि प्रवाशांसाठी तिकीटांचा दर काय असणार आहे.

देशातील पहिली वॉटर मेट्रो

देशातील पहिली वॉटर मेट्रो ही निसर्गरम्य अशा केरळमधल्या कोची शहरामध्ये सुरू होणार आहे. केरळ राज्याचा हा ड्रीम प्रॉजेक्ट अखेर पूर्ण झाला असून उद्या या वॉटर मेट्रोचा उद्धाटन सोहळा संपन्न होणार आहे. या कोची वॉटर मेट्रो पोर्टसाठी 1 हजार 136 कोटी रूपयाचा खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्प केरळ राज्य सरकार व जर्मन येथील केएफडब्ल्यु या बँकेच्या आर्थिक सहाय्याने पूर्ण केला जात आहे.

कोची शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता रहिवाशांना प्रवासासाठी पर्याय मिळावा व राज्याच्या पर्यटनाला ही चालना या उद्देशाने केरळ सरकारने हा प्रकल्प हाती घेतला होता. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकल्पाला केरळ राज्याचा ड्रीम प्रॉजेक्ट म्हणून संबोधले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट व ट्विटरच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे.

कोची वॉटर मेट्रोचे वैशिष्ट्ये

कोची वॉटर मेट्रोच्या माध्यमातून आसपासची 10 बेटे या पोर्टशी जोडली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी हायब्रीड बोटिंचा वापर केला जाणार आहे. या विशेष बोटिंना गुस्सी इलेक्ट्रिन बोट या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. या बोटिंमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक आणि दिव्यांग प्रवाशांना सुद्धा सोयीचं असेल अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

वॉटर मेट्रोचा मार्ग व दर

या वॉटर मेट्रोच्या माध्यमातून आसपासची 10 बंदरे जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये हायकोर्ट ते वायपिंन टर्मिनल व विट्टीला ते कक्कनड टर्मिनल अशा दोन मार्गावर वाहतुक सुरू करण्यात येणार आहे.  सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही सेवा सुरू असणार आहे. सकाळच्या व संध्याकाळच्या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो फेरी असणार आहे.

कोची मेट्रोच्या कार्डवर वॉटर मेट्रोचा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासोबतच वॉटर मेट्रोमध्ये प्रवाशांना विशेष सवलत देण्यात आली आहे. साप्ताहिक पासासाठी प्रवाशांना 180 रूपये मोजावे लागणार आहेत. या पासवर प्रवाशांना 12 वेळा प्रवास करता येईल. तर एक महिन्याच्या पाससाठी 600 रूपये आकारले जाणार आहेत. तर तीन महिन्याच्या पासची किंमत 1500 रूपये ठेवण्यात आली आहे.