Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

SBI Bluechip Fund: शेअर मार्केटमधील अनिश्चित काळात गुंतवणूकदारांना सातत्यपूर्ण रिटर्न देणारा एसबीआय ब्लुचिप फंड

SBI Bluechip Fund: मागील पाच वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतल्यास AMFI च्या आकडेवारीनुसार एसबीआय ब्लुचिप फंडाने सरासरी 12.06% रिटर्न दिला. लार्ज कॅप फंडांमध्ये 12% रिटर्न देणाऱ्या मोजक्याच फंड योजनांमध्ये एसबीआय ब्लुचिप फंडाचा समावेश आहे.

Read More

Mutual Fund: SIP द्वारे 1 कोटीचा टप्पा गाठायचा आहे? फक्त महिन्याला इतकी करा गुंतवणूक

सगळेच ढोबळ मनाने कुठे गुंतवणूक करु म्हटल्यावर ती SIP मध्ये करण्याचा सल्ला देतात. कारण, SIP मध्ये जर प्लॅनिंगने गुंतवणूक केल्यास छोटी रक्कम गुंतवली तर दीर्घ काळाने तुम्हाला एकठोक मोठी रक्कम मिळवता येते. पण, त्यासाठी कोणती SIP निवडायची हा प्रश्न राहतो. त्याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Investment Risk: भांडवली बाजार तेजीत! मिड आणि स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे का?

सध्या भांडवली बाजार तेजीत असल्याने लहान आणि मध्यम कंपन्यांचे शेअर्सचे मूल्यही वाढले आहे. मात्र, मिड आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ नाही, असे गुंतवणूक सल्लागारांना वाटते. वर गेलेला बाजार खाली आपटल्यास मोठे नुकसान होऊ शकते. मग याला पर्याय काय? वाचा.

Read More

Mutual Fund: तुमची SIP कोण मॅनेज करतंय? काही माहिती आहे का? वाचा सविस्तर

आजकाल सगळीकडे म्युच्युअल फंड्सचा बोलबाला आहे. जो-तो मुच्युअल फंडमधील SIP मध्ये गुंतवणूक करतोय. पण, आपल्या सगळ्यांचा पैसा कोण मॅनेज करतोय? कसा काय एवढा रिटर्न मिळतो? याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? चला तर मग याविषयी सविस्तर समजून घेऊया.

Read More

Mutual Fund: ऑगस्ट महिन्यात म्युचुअल फंडात रेकॉर्ड ब्रेक 15,814 कोटींची गुंतवणूक

काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एका रिपोर्टनुसार शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. या सर्वांचा अनुकूल परिणाम गुंतवणूकदारांवर झाला असल्याचे पाहायला मिळते आहे.

Read More

Mutual Fund: म्युच्युअल फंडमधून पैसे काढायचा विचार करताय? या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. आता तुम्हाला पैसे काढायचे आहेत. पण त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागणार आहेत. त्याशिवाय तुम्ही जर पैसे काढायचा विचार करत असल्यास, तुम्हाला तोटा होऊ शकतो. चला तर मग हे काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

Read More

AI tool For Mutual Fund : म्युच्युअल फंडांच्या गैरव्यवहाराला आळा घालणार सेबी; एआय 'टूल' ची घेणार मदत

म्युच्युअल फंड कंपन्याचे वितरक, एजंट यांच्याकडून अशा प्रकारचे गैर व्यवहार केले जातात. मात्र, याचा शोध घेणे सहज शक्य नाही. त्यासाठीच आम्ही एआय टूल विकसित करत आहोत. ज्यामुळे अल्गोरिदमच्या माध्यामातून म्युच्युअल फंडाची विक्री करताना होणाऱ्या गैरव्यवहाराचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे स्पष्टीकरण सेबीकडून देण्यात आले आहे.

Read More

Mutual Funds: या गोष्टी म्युच्युअल फंडला बनवतात खास, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

आपला पैसा एका चांगल्या ठिकाणी गुंतवून आपले आर्थिक ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल होय. मात्र, त्यासाठी म्हणजेच गुंतवणुकीसाठी चांगले ठिकाण माहिती असणे आवश्यक आहे. सध्या गुंतवणुकीच्या उपलब्ध पर्यायांपैकी म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांसाठी लोकप्रिय आणि अष्टपैलू पर्याय म्हणून समोर आला आहे. तो का खास आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Zerodha Passive Funds: झिरोधाची म्युच्युअल फंड व्यवसायात उडी; 'या' दोन नव्या योजना लवकरच येणार

झिरोधा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या दोन पॅसिव्ह फंड योजना लवकरच येणार आहेत. म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच कंपनीकडून योजना लाँच करण्यात येत आहेत. कोणत्या दोन योजना आहेत जाणून घ्या?

Read More

NFO Alert: 360 वन म्युच्युअल फंडने लाॅंच केला बॅलन्स्ड हायब्रिड फंड, गुंतवणूक करायची आहे? पाहा डिटेल्स

360 वन म्युच्युअल फंडने सोमवारी, 4 सप्टेंबरला म्हणजे आजच बॅलन्स्ड हायब्रिड फंड लाॅंच केला आहे. दीर्घ कालीन भांडवल वाढवण्यासाठी आणि कमाई करण्याच्या उद्देशाने हा न्यू फंड ऑफर (NFO) ओपन करण्यात आला आहे. ही ओपन एंडेड स्कीम असून सबस्क्रीप्शनसाठी तो 18 सप्टेंबरपर्यंत ओपन राहणार आहे. अधिक जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

Read More

Best Small Cap Funds: सर्वाधिक रिटर्न देणारे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड; तीन वर्षात 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा

आघाडीच्या म्युच्युअल फंड हाऊसच्या स्मॉल कॅप योजनांनी मागील काही वर्षात चांगला परतावा दिला आहे. काही योजनांनी तर 40% पेक्षा जास्त परतावा दिला. जर तुम्ही स्मॉल कॅप योजनांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर या योजनांचा परतावा पाहा. स्मॉल कॅप योजनांमध्ये जोखीमही जास्त असते.

Read More

Top 5 SBI Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर SBI चे हे फंड्स जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांपासून HDFC, ICICI आणि SBI चे म्युच्युअल फंड चांगला परतावा देताना दिसत आहे. त्यामुळे या बँकांच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे पहायला मिळते आहे. या लेखात SBI म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 स्कीम आणि त्याचे रिटर्न्स आपण समजून घेऊयात.

Read More