कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence)एआयचा (AI) वापर आता सर्वच क्षेत्रामध्ये केला जात आहे. त्याच प्रमाणे सेबी(SEBI) देखील आता एआयचा वापर करून म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गैरव्यवहारावर निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी सेबीकडून एयआय टूल विकसित करण्याचे काम सुरू आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. त्या मुंबईत आयोजित चौथ्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत होत्या.
चुकीच्या पद्धतीने म्युच्युअल फंडाची विक्री-
म्युचुअल फंड कंपन्यांकडून काही वेळा गुंतवणूकदारांना चुकीच्या पद्धतीने म्युच्युअल फंडाच्या योजनांची विक्री केली जात आहे. याचे उदाहरण देत असताना माधवी पुरी म्हणाल्या, क एका 90 वर्षीय गुंतवणूकदाराने 7 वर्षाच्या लॉक-ईन कालवधीच्या फंडामध्ये गुंतवणूक केली. म्युच्युअल फंडाकडून संबंधित प्रोडक्टची करण्यात आलेली विक्री ही चुकीची होती. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी सेबीकडून एआय टूलची मदत घेणार आहोत. त्यावर सध्या काम सुरु असल्याचे माधवी पुरी यांनी सांगितले.
गैरव्यवहांराचा शोध घेणे सोपे होणार?
म्युच्युअल फंड कंपन्याचे वितरक, एजंट यांच्याकडून अशा प्रकारचे गैर व्यवहार केले जातात. मात्र, याचा शोध घेणे सहज शक्य नाही. त्यासाठीच आम्ही एआय टूल विकसित करत आहोत. ज्यामुळे अल्गोरिदमच्या माध्यामातून म्युच्युअल फंडाची विक्री करताना होणाऱ्या गैरव्यवहाराचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे स्पष्टीकरण सेबीकडून देण्यात आले आहे.