Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Risk: भांडवली बाजार तेजीत! मिड आणि स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे का?

MF lumpsums Investment Risk

सध्या भांडवली बाजार तेजीत असल्याने लहान आणि मध्यम कंपन्यांचे शेअर्सचे मूल्यही वाढले आहे. मात्र, मिड आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ नाही, असे गुंतवणूक सल्लागारांना वाटते. वर गेलेला बाजार खाली आपटल्यास मोठे नुकसान होऊ शकते. मग याला पर्याय काय? वाचा.

lumpsums Investment Risk: सध्या भांडवली बाजार तेजीत आहे. निफ्टी निर्देशांकाने 20 हजार अंकांचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत गुंतवणुकीचे निर्णय काळजीपूर्वक घेण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ देत आहेत. मिड  आणि स्मॉल कॅप फंडात एकरकमी गुंतवणूक करण्याची योग्य वेळ नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 

एकरकमी गुंतवणूक का टाळावी?

सध्या भांडवली बाजार तेजीत असल्याने मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सचा भाव वधारला आहे. मागील 6 महिन्यात Nifty 50 निर्देशांक 15.5 टक्क्यांनी वधारला आहे. सोबतच निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्स 57%, निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स 39% आणि निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स 35 टक्क्यांनी वधारला आहे. 

स्मॉल आणि मिड कॅप शेअर्स महागले

सर्व इंडेक्स अल्प कालावधीत वर गेल्याने शेअर्सचे मूल्य वाढले आहे. स्मॉल आणि मिड कॅप कंपन्या ब्लू चीप स्टॉकच्या तुलनेने जास्त धोकादायक समजल्या जातात. (Lumpsums Investment Risk small cap funds)
जर भांडवली बाजार अचानक कोसळला तर गुंतवणुकीचे मूल्य कमी होईल. अशा परिस्थितीत योजनेतून लगेच बाहेरही पडता येणार नाही. त्यामुळे या स्मॉल, मिड कॅप फंडात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ नाही, असे सल्लागारांचे मत आहे. 

गुंतवणूक करण्यासाठी इतर पर्याय कोणते?

स्मॉल आणि मिड कॅप फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी हायब्रीड आणि बॅलन्स्ड अॅडव्हानटेज फंडमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. या फंडांद्वारे शेअर्स आणि बाँड्समध्ये विभागून गुंतवणूक केली जाते. तसेच शेअर्सच्या मुल्यानुसार गुंतवणुकीत बदल केले जातात. इक्विटीवर आधारित SIP मध्ये दरमहा केलेली गुंतवणूकही फायद्याची ठरू शकते, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

दीर्घकाळ गुंतवणूक ठेवण्याची तयारी आहे का?

सध्या भांडवली बाजार तेजीत आहे. स्मॉल आणि मिड  कॅप कंपन्यांचे शेअर्स वर आहेत. (Lumpsums Investment Risk mid cap funds) मात्र, अचानक बाजार खाली आल्यास या कंपन्यांमधील गुंतवणूक जोखमीची ठरेल. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक ठेवण्याची तयारी असेल तरच या फंडात गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. 

सध्या या कंपन्यांचे शेअर्स तेजीत असल्याने या फंडातील गुंतवणूक काढून कमी जोखीम असलेल्या फंडामध्ये गुंतवणूक वळवण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. (Small cap fund risk) मागील 6 महिन्यात किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात लहान आणि मध्यम कंपन्यांच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे. प्रमाणापेक्षा जास्त खरेदीचे नकारात्मक परिणाम येत्या काळात दिसू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.