• 24 Sep, 2023 02:45

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund: ऑगस्ट महिन्यात म्युचुअल फंडात रेकॉर्ड ब्रेक 15,814 कोटींची गुंतवणूक

Mutual Fund

काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एका रिपोर्टनुसार शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. या सर्वांचा अनुकूल परिणाम गुंतवणूकदारांवर झाला असल्याचे पाहायला मिळते आहे.

गेल्या काही महिन्यांपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणुक जोरात आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आता अनेकांच्या पसंतीस पडताना दिसते आहे. ऑगस्ट 2023 या महिन्यात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने 20,245 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या पाच महिन्यातील हा विक्रमी आकडा असल्याचे स्वतः असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडने (Association of Mutual Fund) म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाला पसंती दर्शवली असून येत्या काळात हा पर्याय अधिक लोकप्रिय ठरू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.

SIP जोरात, रिटर्न्स देखील समाधानकारक 

गेल्या काही वर्षांपासून तरुणाईचा कल म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीकडे वाढतो आहे. मुदत ठेव, आवर्ती ठेव, पोस्ट ऑफिस योजना, एलआयसी आदी पारंपारिक गुंतवणूक पर्यायाला नवी पिढी उत्साही नाहीये. म्युच्युअल फंडात जोखीम असली तरीही त्यातून समाधानकारक परतावा मिळतो हे आता त्यांना माहिती झाले आहे, त्यामुळेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (Systematic Investment Plan) म्युच्युअल फंड योजनांमध्ये एकूण 15,814 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.जुलैमध्ये ही गुंतवणूक 15,243 कोटी रुपये इतकी होती.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये 20,245.26 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, तर जुलै 2023 मध्ये ही गुंतवणूक केवळ 7625 कोटी रुपये इतकी नोंदवण्यात आली होती.

स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड 

काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एका रिपोर्टनुसार शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. या सर्वांचा अनुकूल परिणाम गुंतवणूकदारांवर झाला असल्याचे पाहायला मिळते आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा पर्याय त्यामुळेच जास्त प्रमाणात निवडला जातो आहे. ऑगस्टमध्ये स्मॉल कॅप फंडांमध्ये 4265 कोटी रुपयांची गुंतवणूक नोंदवण्यात आली आहे, जी जुलैमध्ये 4171 कोटी रुपये इतकी होती. तर दुसरीकडे 2512 कोटी रुपयांची गुंतवणूक मिड कॅप फंडांमध्ये झाली असून जी जुलैमध्ये केवळ 1623 कोटी रुपये इतकी होती.