Mutual Fund : म्युच्युअल फंडची मार्केटमध्ये सध्या खूप चलती आहे. कारण, एकाचवेळी तुम्हाला स्टाॅक्स, बाॅण्ड आणि अन्य सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करता येते. त्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय होत आहे. तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला त्या म्युच्युअल फंडचे काही युनिट्स देण्यात येतात.
त्यामुळे तुम्ही जेवढे युनिट असतील तेवढे किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार विकून पैसे मिळवू शकता. पण, जेव्हा म्युच्युअल फंडमधून पैसे काढायची (mutual fund redemption) वेळ येते. तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. नाहीतर तोटा होऊ शकतो.
मार्केटमध्ये चढ-उतार सुरूच राहतात. त्यामुळे तुमच्या युनिट्समध्ये देखील तो फरक पाहायला मिळतो. त्यालाच नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) म्हणतात. त्यामुळे जेव्हा तुमच्या युनिट्सचा भाव चांगला असेल. तेव्हाच तो विकायला परवडतो. मात्र, एखाद्यावेळी अडचणीचा प्रसंग आल्यास आपण तो ताबडतोब विकून मोकळे होतो. पण, तसे करण्याआधी काही गोष्टी विचारात घेतल्यास फायदा होऊ शकतो.
या गोष्टी ठेवा लक्षात
पैशांची गरज केव्हा पडेल सांगता येत नाही. त्यामुळे आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास, अडचणीच्यावेळी किंवा पैशांची गरज असल्यास ती त्वरित काढतो. त्यामुळे कोणताही विचार न करता पैसे काढणे चुकीचे आहे. पण, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तसे न करता तुम्ही तुमच्या गरजेनुसार म्युच्युअल फंडांवर लोन घेऊ शकता. त्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. कारण, तुमची गुंतवणूक तशीच राहणार आहे.
तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर त्यात चढ-उतार होणे साहजिक आहे. त्यामुळे मार्केटमध्ये थोडी कमी दिसली की गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढण्यावर जोर देतात. पण, तज्ज्ञांनुसार, तुम्ही जर तो फंड दीर्घ काळासाठी ठेवला तर तुम्हाला त्यातून फायदा होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक दीर्घ काळासाठी करणे चांगले ठरू शकते.
अनेकदा गुंतवणुकदार त्यांना चांगला नफा मिळाला की त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होण्याआधीच नफा घेऊन फंड बंद करतात. त्यामुळे तुम्हाला अजून चांगला रिटर्न मिळवायचा असल्यास, ह्या गोष्टी टाळणे गरजेचे आहे.
म्युच्युअल फंडमधून कधी पैसे काढणे योग्य आहे?
म्युच्युअल फंडातून पैसे काढताना काही महत्वाच्या घटकाचा विचार करणे आवश्यक असले तरी अशी एखादी वेळे येते तेव्हा पैसा काढावाच लागतो. त्यापैकी एखादा म्युच्युअल फंड सातत्याने चांगली कामगिरी करत नसल्यास, तुम्ही पैसे काढू शकता. तसेच, तातडीच्या ठिकाणी लोन घेणे हा पर्याय नसल्यास, तेव्हा तुम्ही फंडमधून पैसे काढू शकता. तसेच, गुंतवणुकदारांनी त्यांचे आर्थिक ध्येय किंवा त्यांचे ठरवलेले टार्गेट पूर्ण केल्यास, पैसे काढायचे की तसेच ठेवायचे हा त्यांचाच निर्णय राहणार आहे.