Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Bluechip Fund: शेअर मार्केटमधील अनिश्चित काळात गुंतवणूकदारांना सातत्यपूर्ण रिटर्न देणारा एसबीआय ब्लुचिप फंड

SBI Bluechip Fund

SBI Bluechip Fund: मागील पाच वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतल्यास AMFI च्या आकडेवारीनुसार एसबीआय ब्लुचिप फंडाने सरासरी 12.06% रिटर्न दिला. लार्ज कॅप फंडांमध्ये 12% रिटर्न देणाऱ्या मोजक्याच फंड योजनांमध्ये एसबीआय ब्लुचिप फंडाचा समावेश आहे.

एसबीआय ब्लुचिप फंड हा लार्ज कॅप कॅटेगरीतला फंड आहे. 3 ते 4 वर्षांसाठी गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एसबीआय ब्लुचिप फंड (SBI Blue Chip Fund) चांगला पर्याय ठरु शकतो. या फंड योजनेने सुरुवातीपासून गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 11.76% परतावा दिला आहे.

एसबीआय ब्लुचिप फंडाची सुरुवात 14 फेब्रुवारी 2006 रोजी झाली होती. आजच्या घडीला या फंडाकडे एकूण 38688 कोटींची मालमत्ता आहे. एसबीआय ब्लुचिप फंडाने भारतीय शेअर मार्केटमधील लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एलअ‍ॅंटी, इन्फोसिस या शेअर्सचा समावेश आहे.

मागील पाच वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतल्यास AMFI च्या आकडेवारीनुसार एसबीआय ब्लुचिप फंडाने सरासरी 12.06% रिटर्न दिला. लार्ज कॅप फंडांमध्ये 12% रिटर्न देणाऱ्या मोजक्याच फंड योजनांमध्ये एसबीआय ब्लुचिप फंडाचा समावेश आहे. मात्र हा फंड उच्च जोखीम श्रेणीत येतो.

लार्ज कॅप फंड मुख्यत्वेकरुन लार्ज कॅप शेअर्समध्ये एकूण निधीच्या 80% निधीची गुंतवणूक करतात. लार्ज कॅप शेअर्सचे हे कंपन्यांच्या भांडवलानुसार टॉप 100 कंपन्या समजल्या जातात. या कंपन्यांची आर्थिक पाळेमुळे मजबूत असतात. त्यामुळे शेअर मार्केटमधील अस्थिरतेचा फारसा परिणाम या कंपन्यांवर होत नाही. त्यामुळे लार्ज कॅप फंडांच्या कामगिरीत फारसा परिणाम होत नाही.

एसबीआय ब्लुचिप फंडाच्या रेग्युलर ग्रोथ प्लॅनने अल्प कालावधीत बेंचमार्कच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. एसबीआय ब्लुचिप फंडाने गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या कालावधीत 13.77% रिटर्न दिला. याच काळात बेंचमार्क एसअॅंडपी बीएसई 100 TRI ने 12.51% परतावा दिला आहे.

दोन वर्ष कालावधीत एसबीआय ब्लुचिप फंडाने 9.48% रिटर्न दिला. तर बेंचमार्क एसअॅंडपी बीएसई 100 TRI इंडेक्सने 9.16% परतावा दिला. या फंडात अगदी सुरुवातीपासून ज्यांनी एकरकमी गुंतवणूक केली असेल अशा गुंतवणूकदारांना आजच्या घडीचा सरासरी रिटर्न हा 625.27% इतका आहे.

एसबीआय ब्लुचिप फंडाचा पोर्टफोलिओ

31 ऑगस्ट 2023 नुसार एसबीआय ब्लुचिप फंडाच्या पोर्टफोलिओत 94.29% निधी हा इक्विटीमध्ये गुंतवण्यात आला आहे. डेटमध्ये 0.13% आणि इतर मालमत्ता वर्गात 5.58% निधीची गुंतवणूक करण्यात आली आहे. एसबीआय ब्लुचिप फंडाने 48 शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. यात लार्ज कॅप्समध्ये 65.23% , मिडकॅपमध्ये 8.24% आणि स्मॉलकॅपमध्ये 0.93% आणि इतरमध्ये 19.89% गुंतवणूक केली आहे.

SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा

दरमहा किमान 1000 रुपयांची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना देखील एसबीआय ब्लुचिप फंडाने दमदार रिटर्न दिले आहेत. 1000 रुपयांची एसआयपी 10 वर्ष पूर्ण केल्यास गुंतवणूक रक्कम 120000 इतकी झाली. त्यावर चक्रवाढ परतावा लक्षात घेता गुंतवणूक रक्कम 250991.19 रुपये इतकी वाढली. 10 वर्षात एसआयपीमधून गुंतवणूकदाराला 109.16% रिटर्न मिळाले. 1 वर्षात एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना 11.9%, 2 वर्षासाठी 16.67%, 3 वर्षासाठी 27.18% आणि 5 वर्षासाठी 53.96% परतावा मिळाला आहे. 

(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)