Best Small Cap Funds: मागील तीन वर्षात काही स्मॉल कॅप योजनांनी 40% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. लहान कंपन्यांमधील गुंतवणुकीत जोखीम जास्त असते, मात्र, चांगला परतावा मिळण्याची शक्यताही जास्त असते. एकंदर स्मॉल कॅप कंपन्यांचा विचार करता 36% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.
क्वांट स्मॉल कॅप फंड
मागील तीन वर्षात क्वांट स्मॉल कॅप फंडाने 48.72% परतावा दिला. एका वर्षात 39% पेक्षा जास्त परतावा दिला. ही योजना S&P आणि BSE 250 स्मॉल कॅप इंडेक्सला फॉलो करते. कमीत कमी 1 हजार रुपयांपासून पुढे या योजनेत गुंतवणूक करता येते. ही एक ओपन एंडेड स्कीम असून स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड
या योजनेने मागील तीन वर्षात 45% परतावा दिला आहे. तर एका वर्षात सर्वाधिक 35% परतावा दिला. ही योजना S&P आणि BSE 250 स्मॉल कॅप इंडेक्सला फॉलो करते. 16 सप्टेंबर 2010 रोजी या फंडची स्थापना झाली आहे. या फंडचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला आहे.
HSBC स्मॉल कॅप फंड
या योजनेने तीन वर्षात 42% परतावा दिला आहे. एका वर्षात सर्वाधिक 32% परतावा दिला. ही योजना S&P आणि BSE 250 स्मॉल कॅप इंडेक्सला फॉलो करते. या फंडाची 98.58% गुंतवणूक देशी कंपन्यांमध्ये आहे. सुमारे 10% गुंतवणूक मीड कॅप कंपन्यांमध्ये देखील केली आहे. या योजनेमध्ये जोखीम जास्त आहे, मात्र, परताव्याची शक्यताही जास्त आहे.
HDFC स्मॉल कॅप फंड
या योजनेने मागील तीन वर्षात 40% परतावा दिला आहे. तर एका वर्षात सर्वाधिक 37% परतावा दिला. ही योजना S&P आणि BSE 250 स्मॉल कॅप इंडेक्सला फॉलो करते. या फंडमधील गुंतवणुकीतही जोखीम जास्त आहे. फंडांद्वारे 21066 कोटींची अॅसेट मॅनेज केली जाते.
स्मॉल कॅप फंड म्हणजे काय?
ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल 5 हजार कोटींपेक्षा कमी असते, अशा कंपन्यांना स्मॉल कॅप कंपनीज म्हटले जाते. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्या योजना आहेत त्यांना स्मॉल कॅप फंड स्कीम असे म्हणतात. या कंपन्या लहान असल्याने यात जोखीम जास्त असते. मात्र, कंपन्यांना प्रगती करण्यासाठी संधी असल्याने चांगला परतावाही मिळू शकतो. त्यामुळे स्मॉल कॅप इक्विटी फंड फंड अती जोखीम श्रेणीत मोडतात.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)