Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Calculator: महिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवून कोट्याधीश होऊ शकता का? SIP परतावा कसा मोजायचा? वाचा

SIP Calculator

Image Source : https://www.freepik.com/

एसआयपीच्या माध्यमातून अगदी कमी रक्कमेसह म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. अनेक फंड्समध्ये दरमहा अगदी 500 ते 1000 रुपये गुंतवण्याचीही सुविधा मिळते.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी एसआयपी हे लोकप्रिय माध्यम आहे. एसआयपीच्या माध्यमातून अगदी कमी रक्कमेसह म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. अनेक फंड्समध्ये दरमहा अगदी 500 ते 1000 रुपये गुंतवण्याचीही सुविधा मिळते. कमी गुंतवणुकीत सुरक्षित परताव्यामुळे एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक तरूणवर्गामध्ये लोकप्रिय होत आहे.

अनेकांना कमी कालावधीमध्ये 1 कोटी रुपयांचा टप्पा गाठायचा असतो. परंतु, दरमहा फक्त 1 हजार रुपये गुंतवून तुम्ही खरचं कोट्याधीश होऊ शकता का? एसआयपी परतावा कसा मोजायचा? याविषयी या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.

एसआयपी परतावा कसा मोजायचा?

एसआयपी परतावा मोजण्याचा फॉर्म्युला हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी किचकट ठरू शकतो. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही किती महिने एसआयपी भरली आहे, किती रक्कम गुंतवली आहेव गुंतवणुकीवर मिळणारा परतावा अशा विविध गोष्टींचा समावेश असतो. या आधारावर मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम समजते.

मात्र. अशा फॉर्म्युल्याच्या मदतीने परतावा मोजणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी अवघड ठरू शकते. अनेक शेअर मार्केट व गुंतवणुकीशी संबंधित वेबसाइटवर एसआयपी कॅल्क्युलेटर उपलब्ध असते. एसआयपी गुंतवणुकीच्या माध्यमातून ठराविक वर्षांनी अंदाजे किती रक्कम मिळू शकते, याविषयीची माहिती हे कॅल्क्युलेटर देतात.

दरमहा 1 हजार रुपये गुंतवून कोट्याधीश होता येईल का?

महिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवून कोट्याधीश होऊ शकता, याबाबत तुम्हीही नक्कीच ऐकले अथवा वाचले असेल. परंतु, हे खरचं शक्य आहे का? समजा, तुम्ही वयाच्या 27व्या वर्षी म्युच्युअल फंडमध्ये दरमहा 1 हजार रुपये गुंवायला सुरुवात केली. वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत सलग 33 वर्ष गुंतवणूक केली आहे. अशा स्थितीमध्ये 15 टक्के व्याजाने परतावा मिळाला तरच वयाच्या 60व्या वर्षी 1.10 कोटी रुपये मिळतील. मात्र, नियमितपणे 15 टक्के व्याजाने परतावा मिळणे अशक्य असते.

जर तुम्हाला पुढील 10 वर्षात 1 कोटी रुपयांचा परतावा हवा असल्यास दरमहिन्याला जवळपास 44 हजार रुपयांची एसआयपी करावी लागेल. यावेळी सरासरी 12 टक्के व्याजदराने परतावा मिळाल्यास 10 वर्षांनी तुमच्याकडे 1 कोटी रुपये असतील.

मात्र, हे सर्व अंदाज आहेत. एसआयपीमधून मिळणारा परतावा तुमची गुंतवणूक व बाजारातील चढउतार अशा अनेक बाबींवर अवलंबून असते. एसआयपीच्या माध्यमातून कमी गुंतवणुकीत झटपट कोट्यावधी रुपयांचा परतावा मिळणे अशक्य आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगून व संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करायला हवी.

तुम्ही एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुमची गुंतवणूक, गुंतवणूक कालावधी व ठराविक कालावधीत परतावा मिळावा म्हणून निर्धारित केलेली रक्कम या आधारावर परताव्याचा अंदाज बांधू शकता.