Share Market मधील तेजीच्या काळात आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सगळ्यात जास्त एक्साइटमेंट निर्माण करतात ते म्हणजे Small Cap Fund. असाच एक फंड म्हणजे Quant small cap fund direct plan growth. ही स्कीम मार्केटमध्ये धुमाकूळ घालतेय. केवळ 3 वर्षाच्या SIP ने चमकदार परतावा (रिटर्न) या स्कीमने दिला आहे. SIP आणि Lumpsum गुंतवणूक करताना किती रक्कम गुंतवल्यावर किती परतावा मिळाला असता हे तर आपण पाहणार आहोतच, पण अशा प्रकारच्या स्कीममधले धोकेही जाणून घेऊन ते Mahamoney ने तुमच्यासमोर ठेवले आहेत
Quant small cap fund direct plan growth चा असा आहे परतावा
या स्कीममध्ये जर केवळ 2 हजार 500 रुपयाची SIP तीही फक्त 3 वर्षापूर्वी ज्याने सुरू केली असेल ना त्याला आज 1 लाख 73 हजार 98 रुपयांचा परतावा आजच्या तारखेला मिळाला असता. 5 हजारच्या SIP ने 3 लाख 46 हजार 196 तर 10 हजाराच्या SIP ने 6 लाख 92 हजार 392 रुपये इतका परतावा मिळाला असता. आणि हेच जर तुम्ही दरमहा 15 हजारची एसआयपी केली असती तर 10 लाख 38 हजार 587 रुपये इतका परतावा मिळाला असता. म्हणजेच आजच्या तारखेपर्यंत 3 वर्षाच्या कालावधीत 92.33 टक्के इतका घवघवीत परतावा Quant small cap fund direct plan growth ने दिला आहे. Groww App ने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. जर 3 वर्षापूर्वी कुणी Lumpsum 3 लाख गुंतवले असते तर आज 10 लाख 78 हजार 482 रुपये झाले असते.
Small Cap Fund मध्ये चढ-उतार असतात तीव्र
या प्रकारच्या स्कीममध्ये बाजाराच्या तेजीच्या काळात परतावा चांगला मिळतो, असे असले तरी शेअर बाजाराच्या घसरणीच्या काळात स्मॉल कॅप कंपनीवर जास्त परिणाम होताना दिसतो. पर्यायाने अशा Mutual Fund Scheme मध्येही मोठे नुकसान होण्याची देखील शक्यता असते.
अगदी Quant small cap fund direct plan growth या स्कीमचेच उदाहरण बघितले तरी ही गोष्ट सहज लक्षात येईल. आजच्या तारखेपर्यंत एक वर्षाच्या कालावधीचा विचार केला तर या स्कीमने केवळ 5.25 टक्के इतका परतावा दिला आहे. म्हणजे वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख 5 हजार 250 रुपये इतकेच झाले असते. या कालावधीत इथे नफ्याचे प्रमाण कमी तरी राहिलेले दिसतेय. मात्र, बाजार लिंक योजनांमधील परतावा हा मूळ गुंतवणूक रकमेपेक्षा कमी देखील होऊ शकतो.
Very High Risk या गटातली ही स्कीम आहे. Small Cap Funds हे जास्त जोखीमयूक्त मानले जातात. याठिकाणी आणखीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे कोणत्याही स्कीमची मागील कामगिरी ही भविष्यातील तशाच कामगिरीची निश्चिती नसते. येणाऱ्या कालावधीतील शेअर बाजाराची स्थिती, फंड मॅनेजरची कामगिरी अशा काही गोष्टी देखील यात महत्वाच्या ठरतात.
Small Cap Fund मध्ये गुंतवणूक करताना हे 2 मुद्दे महत्वाचे
Small cap fund मध्ये गुंतवणूक करताना आणखीही 2 मुद्दे विचारात घेणे महत्वाचे मानले जाते. एक म्हणजे या प्रकारची गुंतवणूक ही Core Portfolio चा भाग नसून Satellites portfolio चा भाग मानली जाते. यामुळे एकूण गुंतवणूक रकमेपैकी जास्तीत जास्त 15 ते 35 टक्के इतकीच रक्कम यात गुंतवणे आदर्श मानले जाते. दुसरे म्हणजे अशी गुंतवणूक ही केवळ 1 कीव 3 वर्षासाठी नाही तर लॉन्ग टर्मसाठी केल्यास त्यातली जोखीम कमी होताना दिसते.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)