Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Investment: एसआयपी करताना ‘या’ चूका टाळा, अन्यथा होईल नुकसान

SIP Investment

Image Source : https://www.freepik.com/

तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी जाणून घ्यायला हवे.

सुरक्षित गुंतवणूक व दीर्घकालीन नफा यासाठी प्रभावी निर्णय घेणे गरजेचे असते. त्यामुळे गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. सध्या म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक लोकप्रिय मार्ग म्हणून समोर आला आहे. मात्र, अनेकजण केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. परंतु, कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करणे नुकसानदायक ठरू शकते.

तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी जाणून घ्यायला हवे.

एसआयपी म्हणजे नक्की काय?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी एसआयपी म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायला हवे. अनेकजणांचा म्युच्युअल फंड आणि एसआयपीमध्ये गोंधळ उडतो. म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. तर एसआयपी हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे.

एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही दरमहा, त्रैमासिक पद्धतीने ठराविक रक्कम म्चुच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. एसआयपीच्या रक्कमेत देखील वेळेनुसार  बदल करू शकता.

एसआयपी करताना या चूका टाळा

कमी कालावधीदरमहिन्याला फक्त 500, 1000 रुपये गुंतवून कोट्याधीश होऊ शकता अशा जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. मात्र, सुरक्षितरित्या जास्तीत जास्त परतावा मिळवण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन असते. कमी कालावधीसाठी एसआयपी केल्यास त्यातून जास्त परतावा मिळण्याची शक्यता कमी आहे. दीर्घकालीन उद्देश ठरवून एसआयपी करायला हवी. सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंडमध्ये 8 ते 10 टक्के परतावा मिळतो. या परताव्याचा अंदाज घेऊन तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी ठरवू शकता.
गुंतवणुकीची रक्कम न बदलणे-

टप्प्याटप्प्याने एसआयपीच्या रक्कमेत वाढ करणे कधीही फायदेशीर ठरते. सुरुवातीच्या टप्प्यातच मोठी गुंतवणूक करणे टाळायला हवे. अनेकजण उत्पन्न व आर्थिक स्थिती लक्षात न घेता परताव्याच्या अपेक्षेने मोठी गुंतवणूक करतात. मात्र, यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

तुम्ही सुरुवातीला कमी रक्कमेपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. त्यानंतर परताव्यानुसार या रक्कमेत टप्प्याटप्प्याने वाढ करायला हवी.

एकाच प्रकारची गुंतवणूकम्युच्युअल फंडमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित नाही, हे आधी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या गुंतवणुकीतही विविधता असायला हवी. एकाच प्रकारच्या फंडमध्ये सर्व रक्कम गुंतवणे आर्थिक दृष्ट्या महागात पडू शकते. एकाच फंडमध्ये गुंतवणूक केल्यास परतावा देखील जास्त मिळणार नाही. त्यामुळे डेट, इक्विटी आणि इतर मालमत्तेमध्ये गुंतवणुकीचे वर्गीकरण करायला हवे. 
अचानक पैसे काढून घेणेसुरक्षित नफा मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक. एसआयपी सतत सुरू करणे आणि बंद केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. बाजारातील चढउतारामुळे अनेकदा नुकसानही होऊ शकते. अशा स्थितीमध्येही एसआयपी सुरू ठेवल्यास भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो.

थोडक्यात, एसआयपी गुंतवणुकीची प्रक्रिया ही दीर्घकालीन आहे. गुंतवणुकीविषयी कोणताही अभ्यास न करणे, अल्पकालीन लक्ष्य, गुंतवणुकीत सातत्य नसणे, फंड्सची फी व पोर्टफोलियोकडे लक्ष न देणे या चुका एसआयपी करताना टाळायला हवा. या चुका टाळल्यास तुम्हाला नक्कीच गुंतवणुकीतून फायदा मिळेल.