Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 5 SBI Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर SBI चे हे फंड्स जाणून घ्या

SBI Mutual Fund

गेल्या काही महिन्यांपासून HDFC, ICICI आणि SBI चे म्युच्युअल फंड चांगला परतावा देताना दिसत आहे. त्यामुळे या बँकांच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे पहायला मिळते आहे. या लेखात SBI म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 स्कीम आणि त्याचे रिटर्न्स आपण समजून घेऊयात.

म्युच्युअल फंड म्हणजे काय हे आता अनेकांना माहिती झाले आहे. भारतीय नागरिकांची आर्थिक साक्षरता आता हळूहळू वाढते आहे. अनेक पगारदार कर्मचारी पारंपारिक गुंतवणूक योजनेत पैसे न गुंतवता Mutual Fund मध्ये पैसे गुंतवणे पसंत करताना दिसतात.

या गुंतवणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेयर बाजारात उतारचढाव आले तरी गुंतवणूकदारांना नफा मिळवण्याची शक्यता अधिक असते. मार्केट जोखीम असली तरी इतर गुंतवणूक योजनेच्या तुलनेत ही योजना चांगले रिटर्न्स देताना आढळते.

गेल्या काही महिन्यांपासून HDFC, ICICI आणि SBI चे म्युच्युअल फंड चांगला परतावा देताना दिसत आहे. त्यामुळे या बँकांच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे पहायला मिळते आहे. या लेखात SBI म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 स्कीम आणि त्याचे रिटर्न्स आपण समजून घेऊयात.

एसआयपी म्हणजेच Systematic Investment Plan, यामध्ये दरमहा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची सुविधा दिली जाते. खरे तर जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर तुम्हांला चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता अधिक असते. महिना, दोन महिन्यात किंवा वर्षभरात तुम्हाला म्हणावा तितकासा परतावा मिळू शकत नाही हे देखील लक्षात घ्या.

SBI निफ्टी स्मॉलकॅप (SBI Nifty Small Cap) -250 इंडेक्स म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 1 महिन्यात 5.72 टक्के परतावा दिला आहे.

SBI निफ्टी मिडकॅप (SBI Nifty Mid Cap) -150 इंडेक्स म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 1 महिन्यात 4.72 टक्के परतावा दिला आहे.

SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड (SBI Technology Opportunity Mutual Fund) योजनेने गेल्या 1 महिन्यात 4.14 टक्के परतावा दिला आहे.

SBI मॅग्नम कॉमा म्युच्युअल फंड (SBI Magnum Comma Mutual Fund) योजनेने गेल्या 1 महिन्यात 3.81% परतावा दिला आहे.

SBI PSU म्युच्युअल फंड (SBI PSU Mutual Fund) योजनेने गेल्या 1 महिन्यात 3.73 टक्के परतावा दिला आहे.

तसे पहायला गेले तर फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) सारखाचा परतावा गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडमध्ये महिनाभरात मिळतो आहे. त्यामुळे पारंपारिक गुंतवणूक योजनेपेक्षा अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल आहे.

सूचना: महामनी कुठल्याही म्युच्युअल फंडचा प्रचार किंवा प्रसार करत नाही. ही बातमी केवळ म्युच्युअल फंडचे मिळणारे रिटर्न्स यावर आधारित आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही. गुंतवणूकदारांनी स्वतःच्या जोखीमेवर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी.