Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Funds: या गोष्टी म्युच्युअल फंडला बनवतात खास, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

Mutual Fund

आपला पैसा एका चांगल्या ठिकाणी गुंतवून आपले आर्थिक ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल होय. मात्र, त्यासाठी म्हणजेच गुंतवणुकीसाठी चांगले ठिकाण माहिती असणे आवश्यक आहे. सध्या गुंतवणुकीच्या उपलब्ध पर्यायांपैकी म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांसाठी लोकप्रिय आणि अष्टपैलू पर्याय म्हणून समोर आला आहे. तो का खास आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

सध्या मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असल्याच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळत आहे. पण, मागील काही वर्षात म्युच्युअल फंडमध्येच लोक का गुंतवणूक करत आहेत. हा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण, त्याचे खूप फायदे आहेत. त्यामुळेच म्युच्युअल फंडची लोकप्रियता वाढत आहे. तर ती लोकप्रियता कशामुळे आहे. हे आपण पाहणार आहोत.

वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक शक्य

म्युच्युअल फंड वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅसेट्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणुकदारांकडून पैसे कलेक्ट करतात, ज्यामुळे एखाद्या ठिकाणी चांगली कामगिरी न करणाऱ्या गुंतवणुकीचा एकूण पोर्टफोलिओवर जास्त परिणाम होत नाही. त्यामुळे पैसा तोट्यात जाण्याची शक्यता कमी राहते.

अनुभवी मॅनेजमेंट

तुम्ही ज्या फंडमध्ये पैसे गुंतवता, त्याचा रिमोट अनुभवी मॅनेजरच्या हातात असतो. त्यामुळे बाजारातील चढ-उतारावर मात करण्यासाठी, ते त्यांचा अनुभव आणि कौशल्य वापरुन परिस्थितीत बॅलन्स साधतात. तसेच, गुंतवणुकदारांना चांगला रिटर्न मिळवून देतात.

गुंतवणुकीसाठी सुलभ

तुम्ही नवे असा किंवा जुने, त्याच्याशी म्युच्युअल फंडला फरक पडत नाही. कारण, या ठिकाणी कोणीही गुंतवणूक करु शकते. तसेच, तुमच्या बजेटनुसार तुम्ही गुंतवणूक करायला मोकळे आहात. म्हणजे काही म्युच्युअल फंड 100 रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सुविधा देतात.

कॅटेगरीनुसार करता येते गुंतवणूक

म्युच्युअल फंडमध्ये अनेक कॅटेगरी आहेत. ज्याद्वारे तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय आणि रिस्क मॅनेज करुन, तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी गुंतवणूक करु शकता. म्हणजेच तुम्हाला ज्या ठिकाणी सर्व बाबी ठीक असल्याची खात्री होते, तेव्हाच तुम्ही गुंतवणूक करता. तशी सुविधाही म्युच्युअल फंड देते.  

लिक्विडीटीची सुविधा उपलब्ध

ओपन एंडेड म्यच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला कधीही तुमच्या युनिट्सची खरेदी किंवा विक्री करता येते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही तुमच्या फंड्समधून पैसे काढू शकता. पण, ते मिळायला तुम्हाला थोडा अवधी लागू शकतो.

SIP द्वारे करु शकता गुंतवणूक

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे (SIP) तुम्ही ठरावीक अंतराने गुंतवणूक करुन फंडमध्ये पैसे जमवू शकता. यामुळे तुम्हाला नियमित गुंतवणुकीची सवय लागते. तसेच, रक्कमही तुम्ही तुमच्या सोयीनुसारच SIP मध्ये टाकू शकता. त्यामुळे हे तुम्हाला जास्त अवघड जात नाही.

टॅक्समध्ये मिळते सवलत

तुम्ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममध्ये (ELSS) गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कायदा 1961 च्या विशिष्ट कलमांतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते. त्यामुळे अशा ठिकाणी गुंतवणूक केल्यास, तुमचा दुप्पट फायदा होऊ शकतो.

दीर्घ काळासाठी करु शकता गुंतवणूक

तुम्ही म्युच्युअल फंडद्वारे दीर्घ काळासाठी गुंतवणूक करु शकता. ज्यामुळे तुम्हाला जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता तयार होते. तसेच, जे काही तुमचे आर्थिक ध्येय असतील तेही पूर्ण होण्यास मदत होते.

फंडविषयी मिळते नियमित अपडेट

म्युच्युअल फंड त्यांच्या फंडच्या कामगिरीविषयी नियमित अपडेट देत असतात. तसेच, यामध्ये होल्डिंग्स, खर्च यांचा समावेश असतो. याशिवाय फंडविषयी इतरही गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. यामुळे गुंतवणुकदारांना या माहितीच्या आधारे योग्य तो निर्णय घेता येतो.

आधी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे अवघड होते. मात्र, आता सर्व सुविधा मोबाईलवर असल्यामुळे तुम्ही त्याचा लाभ घेऊन, म्युच्युअल फंडमध्ये सहज गुंतवणूक करु शकता. तसेच, गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्येच का करावी हे तुम्हाला समजलेच असेल. 

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)