Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2022 मधील भारतातील टॉप 10 सर्वोत्तम म्युच्युअल फंड गुंतवणूक कंपन्या

2022 मधील भारतातील टॉप 10 सर्वोत्तम म्युच्युअल फंड गुंतवणूक कंपन्या

Image Source : www.cred.club

कोणताही म्युच्युअल फंड निवडताना त्याची कामगिरी ही त्याच्या फंड मॅनेजरचे कौशल्य, फंड हाऊसचा आकार, एनएव्ही, गेल्या 10 वर्षांतील कामगिरी आणि त्याचे बाजारातील रेटिंग या घटकांवर अवलंबून असते.

भारतातील म्युच्युअल फंड उद्योग अनेक वर्षांपासून देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावत आहे. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदारांची संख्या चांगलीच वाढली आहे. मागील 5 वर्षांत उद्योगात भरभराट झाली आहे. काही गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपन्यांच्या (Asset management company) शोधात असतात. तेव्हा त्यांना असे वाटते की, चांगली नावाजलेली कंपनी चांगला नफा मिळवून देईन. पण, तांत्रिकदृष्ट्या हे खरे नाही. कोणत्याही म्युच्युअल फंडची कामगिरी ही त्याच्या फंड व्यवस्थापकाचे कौशल्य, फंड हाऊसचा आकार, एनएव्ही, गेल्या 10 वर्षांतील कामगिरी, त्याचे रेटिंग या विविध घटकांवर अवलंबून असते. अशा सर्व बाबींचा विचार करून, आम्ही तुमच्यासाठी 10 प्रमुख कंपन्यांची (AMC)/ म्युच्युअल फंडांची निवड केली आहे. या भारतातील बेस्ट म्युच्युअल फंड कंपन्या आहेत.                       

भारतातील टॉप 10 सर्वोत्कृष्ट म्युच्युअल फंड कंपन्या (Asset management company)

top 10 mutual fund compony
 
1. एसबीआय म्युच्युअल SBI Mutual fund
एसबीआय (State Bank of India) ही भारतातील सर्वांत मोठी आणि गावागावात शाखा असलेली बॅंक आहे. एसबीआय ही भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात 3 दशकांपासून कार्यरत आहे. सर्वप्रथम 1987 मध्ये एसबीआयने म्युच्युअल फंड लॉन्च केला होता. 54 लाखांहून अधिक ग्राहकांनी SBI च्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. एसबीआय म्युच्युअल फंड हे ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येतात. त्यातून तुमची गरज आणि उद्दिष्ट तपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता.

2. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड ICICI Prudential Mutual Fund 
1993 मध्ये लॉन्च केलेला आयसीआयसीआय म्युच्युअल फंड हा मालमत्ता व्यवस्थापनेच्या तुलनेत देशातील सर्वात मोठा फंड मानला जातो. आयसीआयसीआयने व्यावसायिक आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी चांगल्या योजना आणल्या आहेत. नाविन्यपूर्ण प्लॅन्स आणि चांगल्या उत्पादनांच्या बळावर या फंड हाऊसने ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. आयसीआयसीआय द्वारे इक्विटी, डेब्ट, हायब्रीड, टॅक्स सेव्हिंग असे विविध प्रकारचे फंड चालविले जातात.

3. एचडीएफसी म्युच्युअल फंड HDFC Mutual fund
एचडीएफसी म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात लोकप्रिय एएमसीपैकी (Asset management company) एक आहे. 2000 मध्ये या फंड हाऊसने पहिली योजना सुरू केली होती. तेव्हापासून या फंड हाऊसमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत एचडीएफसी म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आहे.

4. डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड DSP Black Rock Mutual Fund 
ही जगातील सर्वात मोठी सूचीबद्ध AMC आहे. ही कंपनी ग्राहकांच्या गुंतवणुकीच्या  विविध गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना आणत असते. या कंपनीचा गुंतवणुकीच्या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक चांगल्या कामगिरीचा रेकॉर्ड आहे.

5. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड Adity Birla Sun Life Mutual Fund
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने आणि त्यातून चांगला परतावा मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. आदित्या बिर्ला फंड हाऊस कर बचत (Tax Saving), वैयक्तिक बचत, संपत्ती वाढवणे आदी गुंतवणुकीच्या उद्दिष्टांमध्ये माहिर आहे. इक्विटी (Equity), डेब्ट (Debt), हायब्रिड (Hybrid), टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड (ELSS) यांसारख्या पर्याय देते. यांचे लिक्विड फंड हे चांगल्या परताव्यासाठी ओळखले जातात.

6. कोटक म्युच्युअल फंड Kotak Mutual Fund
1998 मध्ये लाँच झाल्यापासून कोटक म्युच्युअल फंड ही भारतातील एक लोकप्रिय AMC म्हणून नावारूपास आली आहे. गुंतवणूकदारांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कोटक कंपनीकडून वेगवगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड योजना दिल्या जातात.

7. एल अण्ड टी म्युच्युअल फंड L & T Mutual Fund
एल अण्ड टी म्युच्युअल फंड 1997 मध्ये लॉंच करण्यात आली होती. या फंड हाऊसबद्दल गुंतवणूकदारांमध्ये चांगला विश्वास निर्माण झाला आहे. हा फंड हाऊस गुंतवणूक आणि जोखीम व्यवस्थापनातील शिस्तबद्धतेसाठी ओळखला जातो. तसेच ही कंपनी उच्च दीर्घकालीन जोखीमवर समायोजित कामगिरी प्रदान करण्यावर भर देते. गुंतवणूकदार या फंड हाऊसमधून इक्विटी, कर्ज, यांसारख्या अनेक पर्यायांमधून योजना निवडू शकतात. यांचा हायब्रीड फंड सर्वोत्तम परतावा देणारा फंड मानला जातो.

8. टाटा म्युच्युअल फंड TATA Mutual Fund
टाटा म्युच्युअल फंड दोन दशकांहून अधिक काळ भारतात कार्यरत आहे. टाटा म्युच्युअल फंड हे भारतातील नामांकित फंड हाऊसपैकी एक आहे. या फंड हाऊसने सातत्यपूर्ण कामगिरीसह अव्वल दर्जाच्या सेवेने लाखो ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. टाटाच्या इक्विटी, डेब्ट, हायब्रीड, लिक्विड आणि ईएलएसएस फंड योजना चांगल्या आहेत. गुंतवणूकदार त्यांच्या गरजा आणि उद्दिष्टांनुसार त्यात गुंतवणूक करू शकतात.

9. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड Nippon India Mutual Fund
हा फंड हाऊस 1995 मध्ये लॉंच झाला होता. लॉंच झाल्यापासून निप्पॉन इंडिया ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी म्युच्युअल फंड कंपनी आहे. सातत्यपूर्ण परतावा हा हे या फंडचे वैशिष्ट्ये आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने विविध प्रकारच्या योजना आणल्या आहेत. ज्या गुंतवणूकदारांच्या विविध गरजा पूर्ण करू शकतात. गुंतवणूकदार त्यांच्या उद्दिष्टांनुसार आणि जोखमीच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करू शकतात.

10. सुंदरम म्युच्युअल फंड Sundaram Mutual Fund
सुंदरम म्युच्युअल फंड किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी नाविन्यपूर्ण आर्थिक गुंतवणुकीचे पर्याय देतात. ग्राहकांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नवनवीन योजना आणणे, हे या फंड हाऊसचे वैशिष्ट्ये आहे.