Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund: तुमची SIP कोण मॅनेज करतंय? काही माहिती आहे का? वाचा सविस्तर

Mutual Fund

आजकाल सगळीकडे म्युच्युअल फंड्सचा बोलबाला आहे. जो-तो मुच्युअल फंडमधील SIP मध्ये गुंतवणूक करतोय. पण, आपल्या सगळ्यांचा पैसा कोण मॅनेज करतोय? कसा काय एवढा रिटर्न मिळतो? याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? चला तर मग याविषयी सविस्तर समजून घेऊया.

म्युच्युअल फंड एक मोठा गुंतवणुकीचा प्लॅटफाॅर्म आहे. तुम्ही यात गुंतवणूक केल्यावर तुमचा पैसा शेअर्स, बाॅण्ड्स किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो. या फंडाचे पूर्ण मॅनेजमेंट प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर किंवा फंड मॅनेजर करतात. यामुळे तुम्हाला वैयक्तिक पातळीवर सिक्युरिटीजची थेट खरेदी आणि ते मॅनेज न करता अ‍ॅसेटच्या वेगवेगळ्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा मिळते. तसेच, याद्वारे चांगला रिटर्न ही मिळवता येतो.

म्युच्युअल फंड कोण मॅनेज करते?

भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे मॅनेजमेंट अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्या (AMC) पाहतात. AMC या वित्तीय संस्था आहेत ज्या गुंतवणुकदारांकडून पैसे उभारण्यासाठी आणि स्टॉक्स, बाॅण्ड्स आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्ससारख्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे (सेबी) परवाना प्राप्त आहेत. सेबी ही नियामक संस्था आहे जी देशातील सिक्युरिटीज आणि भांडवली बाजारांवर देखरेख आणि नियमन करते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकदार त्यांचे पैसे AMC कडे सोपवतात. म्हणजेच गुंतवणुकदार SIP किंवा फिक्स्ड गुंतवणूक करतात. जे त्यांच्यावतीने गुंतवणूक मॅनेज करतात. याशिवाय AMC फंड मॅनेज करण्यासाठी चार्ज आकारते, त्याला एक्सपेन्स रेशो म्हणून ओळखल्या जाते. हे चार्ज फंडच्या अ‍ॅसेट्समधून कपात केले जातात. त्यामुळे AMC त्यांचा खर्च अशा पद्धतीने काढून घेतात.

AMC गुंतवणुकदारांच्या वतीने म्युच्युअल फंड योजना बनवतात आणि मॅनेज करतात. प्रत्येक म्युच्युअल फंड योजनेचे एक उद्दिष्ट असते. त्यानुसार मग इक्विटी, डेब्ट, हायब्रिड किंवा थीमॅटिक फंड यामध्ये गुंतवणूक केली जाते. AMC द्वारे नियुक्त प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर किंवा फंड मॅनेजर या गुंतवणुकीचे मॅनेजमेंट करतात.

AMC म्युच्युअल फंड मॅनेजर्स काय करतात?

एवढी मोठी रक्कम मॅनेज करायला AMC मध्ये फंड मॅनेजरची एक टीम असते. जे गुंतवणुकदारांच्या वतीने म्युच्युअल फंडची गुंतवणूक मॅनेज करते. यामुळे प्रत्येक म्युच्युअल फंड योजनांसाठी फंड मॅनेजर गुंतवणुकीचे निर्णय घेतात. तसेच म्युच्युअल फंडची कामगिरी ठरवण्यात या मॅनेजर्सची भूमिका खूप महत्वाची असते.

AMC मधील फंड मॅनेजर्स हे विशिष्ट अ‍ॅसेट्समध्ये कौशल्य प्राप्त आणि अनुभवी प्रोफेशनल्स असतात. कोणताही म्युच्युअल फंड लाॅंच होण्याआधी ते त्याचे उद्दिष्ट आणि धोरण साध्य करण्यासाठी रिसर्च करतात. मार्केटच्या परिस्थितीचे विश्लेषण करतात. त्यानंतरच योग्य सिक्युरिटीजची निवड करतात. त्यामुळेच जास्त रिटर्न मिळायला मदत होते. 

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही पूर्णपणे फंड मॅनेजर्सच्या कोशल्यांवर आणि निर्णय क्षमेतवर अवलंबून असते. त्यामुळे कोणताही गुंतवणुकदार आधी फंड मॅनेजर्सची मागील कामगिरी पाहतो आणि त्यानुसार गुंतवणूक करायची की नाही हे ठरवतो.