Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एसआयपी म्हणजे काय? हे आहेत एसआयपी गुंतवणुकीतील (SIP Investment) फायदे

SIP benefits

अलीकडच्या काळात एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एका विशिष्ट पद्धतीने पैसे गुंतवल्याने गुंतवणूकदारांच्या परताव्यात अनेक पटीने कशी वाढ होते. याबाबत अधिक जाणून घेऊ.

एसआयपी म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना. एसआयपीचा फुलफॉर्म सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan) असा आहे. एसआयपी ही गुंतवणुकीची अशी पद्धत आहे; ज्याद्वारे गुंतवणुकदार नियमित  गुंतवणूक करू शकतो.

एसआयपी का सुरू करावी?

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत आणि एकूणच आर्थिक शिस्तीला खूप महत्त्व आहे. एसआयपी तुमची ही गुंतवणुकीची आर्थिक शिस्त राखण्यास मदत करते. शेअर बाजारात नेहमी चढ-उतार होत असतात तरीही एसआयपीद्वारे नियमितपणे गुंतवणूक होत राहते.

benefits of SIP

एसआयपीचे फायदे

किमान रकमेद्वारे गुंतवणूक (Investment by minimum amount) : एसआयपीद्वारे कमीतकमी रकमेत आपण गुंतवणूक करू शकतो. विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, छोटा उद्योजक किंवा एखादा उद्योगपती चांगल्या परताव्यासाठी एसआयपी सुरू करू शकतो. दीर्घ कालावधीसाठी सातत्याने लहान लहान रक्कम गुंतवून तुम्ही मोठी गुंतवणूक उभी करू शकता. 500 रूपयांपासून SIP मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. 

गुंतवणुकीची सुलभता (Ease of investment) : जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1000 रूपये गुंतवायचे असतील तर प्रत्येक महिन्याला बॅंक खात्यातून 1 हजार रूपये एसआयपीच्या खात्यात वळवले जातात. या पैशांमधून आपण निवडलेल्या कंपनीचे युनीट खरेदी केले जाता. ज्याचा लाभ आपल्याला भविष्यात मिळतो.

जोखीम कमी करणे (Low risk) : गुंतवणूकदार इक्विटी फंडमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करत असेल तर तिथे बाजारभावाच्या एकाच दिवशी गुंतवणूकदाराचे पैसे गुंतवले जात नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम कमी होते. दीर्घकाळासाठी SIP द्वारे गुंतवणूक होत असल्याने गुंतवणूकदाराला वेगवेगळ्या किमतीने युनीट्स खरेदी करून मिळतात. परिणामी अनेक वर्षांनंतर बाजाराचा कोणताच नकारात्मक प्रभाव गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीवर दिसून येत नाही.

टॅक्स सवलत (Tax Benefit) : एसआयपीमधून गुंतवणूक करताना किंवा केलेली गुंतवणूक काढताना कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही. पण काही फंड फक्त टॅक्स गुंतवणुकीसाठी असतात . पण त्याचा लॉक-इन कालावधी किमान 3 वर्षांचा असतो.

पद्धतशीर आणि शिस्तबद्ध गुंतवणूक (Systematic and disciplined investment) : आपल्या बॅंक खात्यातून आपल्या सोयीनुसार थोडी थोडी रक्कम नियमितपणे गुंतवली जाते. यामुळे आपल्या गुंतवणुकीत शिस्त आणि पद्धतशीपणा राहतो. परिणामी बचतीची चांगली सवय लागते .

चक्रवाढ व्याजाचा लाभ (Compounding interest) : द्वारे गुंतवणूक केल्यास व्याजावर व्याज मिळते. म्हणजे एसआयपीच्या गुंतवणूक रकमेवर जो काही परतावा मिळतो, तो पुन्हा त्याच ठिकाणी गुंतवला जातो. त्यामुळे गुंतवणूकदाराच्या परताव्यात वाढ होते.

कधीही पैसे काढण्याची सुविधा (Anytime withdrawal facility) : काही ठराविक फंड वगळता एसआयपीमध्ये लॉक-इन पिरियड नसतो. त्यामुळे तुम्ही कधी पैसे त्यातून काढू शकतो.

सरासरीकरणाचा लाभ (Rupee Cost Averaging) : रुपये मूल्य सरासरीकरणाच्या पद्धतीचा एसआयपीत अधिक लाभ दिसून येतो. रुपये मूल्य सरासरीकरण आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया. 10 रुपये दर्शनी मूल्याचे 10 युनिट्स प्रति युनिट 50 रुपये दराने विशिष्ट तारखेस एका महिन्यात खरेदी केले. तर त्याच तारखेस दुसऱ्या महिन्यात 10 युनिट्सची प्रति युनिट 52 रुपयांस खरेदी केली, तर एका युनिटची सरासरी किंमत 51 रुपये आली. तसेच 52 रुपयांस जेवढी युनिट्सची संख्या खरेदी झाली होती, त्यापेक्षा अधिक युनिट्सची खरेदी 50 रुपये निव्वळ मालमत्ता मूल्यास झाली. दोन महिन्यांत एकत्रित युनिट्सची संख्या ही वाढली आणि सरासरी किंमतसुद्धा कमी आली.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेला अर्थात एसआयपीला खूप महत्त्व आहे. पण प्रत्येक एसआयपी 100 टक्के नफ्याची हमी देत नाही. पण प्रदीर्घ काळात वरील वैशिष्ट्यांमुळे तोट्यापासून किमान संरक्षण मिळवणे शक्य होऊ शकते.