SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. ज्याद्वारे तुम्ही एकाचवेळी बचत आणि चांगला रिटर्न मिळवू शकता. तसेच SIP तुम्हाला महिन्यावारी पैसे गुंतवायची सुविधा देते. त्यामुळे एकठोक रक्कम SIP मध्ये गुंतवण्यापेक्षा त्याच रकमेचा काही भाग तुम्ही दर महिन्याला गुंतवू शकता. समजा एकाचवेळी तुम्हाला 6,000 रुपये गुंतवायचे असल्यास, त्याबदल्यात तुम्ही प्रत्येक महिन्याला 500 रुपये वर्षभरासाठी गुंतवू शकता.
हा प्लॅन गुंतवणुकीच्या दृष्टीने सुलभ आणि सोपा मानला जातो. कारण, या प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक ठरावीक रक्कम महिन्याला गुंतवू शकता. तसेच, त्याची मुदतही सेट करु शकता. याशिवाय तुम्ही SIP सेटअप ही करु शकता. यामुळे प्रत्येक महिन्याला जेवढी तुमची SIP आहे तेवढे पैसे आपोआप कट होतील. तेव्हा तुम्हाला महिना स्वत: भरायचे टेन्शन राहणार नाही.
म्युच्युअल फंडाची कामगिरी पाहा
कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याचे मागील रिटर्न पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे दरवर्षी कमीतकमी 12 टक्के रिटर्न देणारा म्युच्युअल फंड निवडा. तुम्ही या 12 टक्के रिटर्न देणाऱ्या म्युच्युअल फंडात प्रत्येक महिन्याला 3000 रुपये गुंतवल्यास, तीस वर्षात तुम्ही कोट्याधीश व्हाल.
ही आहे कोट्याधीश व्हायची ट्रीक
जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची गुंतवणूक करत असाल आणि त्या पैशांवर दरवर्षी 12 टक्के रिटर्न मिळत असेल. तर मग तीस वर्षांत ती रक्कम एक कोटींपेक्षा जास्त होईल. समजा यावर 12 टक्के रिटर्न मिळत असल्यास व्याजाचे मूल्य 95,09,741 रुपये आहे.
तुम्ही जर गुंतवलेली रक्कम आणि रिटर्न जोडल्यास ती अंदाजे एक कोटी रुपये होईल. मात्र, जर तुमचा म्युच्युअल फंड तुम्हाला वार्षिक 13 टक्के रिटर्न देत असेल तर तुम्हाला कोट्याधीश होण्यासाठी आणि एक कोटी रुपये कमावण्यासाठी तीस वर्षांपेक्षा कमी म्हणजेच 28 वर्षच लागतील. यासाठी फक्त तुम्हाला नियमित 28 वर्ष SIP मध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)