Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) म्हणजे काय? ईटीएफचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या

एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) म्हणजे काय? ईटीएफचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या

ईटीएफ हे म्युच्युअल फंडसारखेच असतात. परंतु, दोघांमधील मुख्य फरक असा आहे की ETFs कोणत्याही स्टॉकप्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर खरेदी किंवा विकले जाऊ शकतात. त्याचे विविध प्रकार आणि फायदे आपण समजून घेणार आहोत.

ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange Traded Fund). हा म्युच्युअल फंड सारखाच गुंतवणुकीचा प्रकार आहे. ईटीएफ हे असे फंड आहेत जे शेअर मार्केटमधील इंडेक्सला फॉलो करतात. म्युच्युअल फंड आणि ईटीएफ मध्ये मुख्ये फरक म्हणजे ईटीएफ मध्ये रिअल टाइम ट्रेडिंग करता येते. कारण ईटीएफची किंमत मार्केटमधील चढ-उताराप्रमाणे बदलते. तर म्युच्युअल फंडचा एनएव्ही (NAV) दिवसाच्या शेवटी ठरते आणि ती किंमत दुसऱ्या दिवशी लागू होते.

ईटीएफचे प्रकार (Types of ETF)

प्रकार (Types of ETF)
इक्विटी ईटीएफ (Equity ETF)
इक्विटी ईटीएफ हा सध्याचा शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा लोकप्रिय प्रकार आहे. हे शेअर्स आणि विविध संस्थांच्या इक्विटीच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये, सेक्टरमध्ये गुंतवणूक करतात. जसे की, आयटी, फार्मा, FMCG, बँकिंग तसेच निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी, निफ्टी 100 यामध्ये गुंतवणूक करतात.

गोल्ड ईटीएफ (Gold ETF )
हा एक कमोडिटी एक्सचेंज-ट्रेडेड फंड आहे. गोल्ड ईटीएफ कंपन्यांचे फंड खरेदी केल्याने तुम्ही प्रत्यक्ष सोन्याच्या संरक्षणाचे ओझे न घेता सोन्याचे मालक बनू शकता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरातील चढ उताराप्रमाणे यांची किंमत बदलत असते.

सिल्वर ईटीएफ (Silver ETF)              
सिल्वर ईटीएफ यामध्ये चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ईटीएफचा समावेश होतो. हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील चांदीमध्ये गुंतवणूक करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील चांदीच्या दरातील चढ उताराप्रमाणे यांची किमत बदलत असते.

डेब्ट ईटीएफ (Debt ETF) 
डेब्ट एक्सचेंज ट्रेडेड फंड हे गुंतवणूक करण्याचे सर्वसाधारण प्रॉडक्ट आहे. जी गुंतवणूकदारांना सुरक्षित निश्चित उत्पन्न मिळवून देण्याची संधी देतात. डेब्ट ईटीएफ नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (NSE) ट्रेड करतात. यांची इतर कंपनीच्या समभागांप्रमाणे बाजारभावानुसार खरेदी आणि विक्री करता येते.

चलन ईटीएफ (Currency ETF)
चलन ईटीएफ फंड प्रामुख्याने विनिमय दराच्या (Exchange rate) चढ उतारांवर नफा मिळवतात. हे फंड वेगवेगळ्या देशांचे चलन खरेदी करून त्या चलनाच्या भविष्यातील कामगिरीच्या आधारावर त्याची खरेदी करतात.

ईटीएफचे फायदे (Benefits of ETF)

फायदे  (Benefits of ETF)
परिणामकार गुंतवणूक (Cost Efficient)
ईटीएफ हे एक गुंतवणुकीचे परिणामकारक प्रॉडक्ट आहे. यात गुंतवणूक करण्यासाठी जी फी आकारली जाते ती रिटर्नच्या तुलनेत अगदी नगण्य मानली जाते.

वैविध्यपूर्ण गुंतवणूक  (Diversified  Securities)
वैविध्यपूर्ण गुंतवणूक हा ईटीएफ गुंतवणुकीतील आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. काही कंपन्यांचे शेअर्स हे ठराविक सेक्टरमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे त्याची जोखीम वाढते. पण ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागली जाते. त्यामुळे जोखीम कमी होते.

ट्रेडिंग फ्लेक्सीब्लिटी (Trading Flexibility)
म्युच्युअल फंडच्या तुलनेत ईटीएफमध्ये अधिक ट्रेडिंग फ्लेक्सीब्लिटी आहे. इतर शेअर्सप्रमाणेच ईटीएफचेही इंट्रा-डे ट्रेडिंग करू शकतो. ईटीएफची एका मार्जिनने खरेदी व विक्री करता येऊ शकते.

टॅक्स फ्रेंडली (Tax Friendly)
ईटीएफ फंड हे म्युच्युअल फंडपेक्षा टॅक्स फ्रेंडली आहेत. ईटीएफ फंड आणि म्युच्युअल फंड या दोन्हींमधून मिळणाऱ्या नफ्यावर लागणारा टॅक्स आणि शुल्क पाहता ईटीएफवर लागणारा टॅक्स आणि शुल्क खूपच कमी आहे.