Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Real Estate: गृहकर्ज महागले तरीही रियल इस्टेट सेक्टरवर परिणाम नाहीच, जाणून घ्या सविस्तर

Expensive Home Loan Impact: 2023 च्या पहिल्या सहामाहीत, देशात परवडणाऱ्या घरांपेक्षा 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मिड-सेगमेंट घरांची विक्री झाली आहे. एका अहवालानुसार, घरांच्या किमती वाढल्या असूनही आणि गृहकर्ज महागले तरीही, मिड-सेगमेंट घरांच्या विक्रीत तेजी आली आहे. या काळात प्रीमियम घरांच्या विक्रीतही वाढ झाली आहे.

Read More

Commercial Gas Cylinder Price Hike: व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या

1 जून 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 83.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती. देशात घाऊक आणि किरकोळ महागाई दरात कपात होत असताना हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच जागतिक स्तरावर देखील गॅसच्या किमती कमी झाल्याचे चित्र होते. परंतु पुढच्याच महिन्यात पुन्हा एकदा सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सामान्य नागरिकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Read More

Liquid Funds: पैसे बचत करणं अवघड जातंय? लिक्विड फंड ठरू शकतो उत्तम पर्याय

सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले पैसे कधीही गरज पडली की काढता येतात. मात्र, त्यावर व्याजदर अत्यंत कमी मिळतो. तसेच पैसे पडून दिसले की आपोआप खर्च वाढतो. त्यामुळे लिक्विड फंडमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. जेव्हा गरज असेल तेव्हा पैसा तत्काळ काढता येतील आणि व्याजदरही चांगला मिळेल.

Read More

Food Inflation: महागाईने सर्वसामान्य चिंतेत, ठोक वस्तू ऐवजी किरकोळ मालखरेदी भर

शेतीमालाच्या वाढत्या किमती आणि पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या समस्या यांमुळे रेडीमेड उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ देखील महागले आहेत. म्हणजेच ठोक माल खरेदी करण्यापेक्षा सुटा माल, पाऊचमध्ये मिळणारा माल सामान्य नागरिक खरेदी करत आहेत.

Read More

Unmarried Pension Scheme: अविवाहितांना सरकार देणार पेन्शन, 'या' राज्याने घेतलेल्या निर्णयाची देशात चर्चा

भारतातील एका राज्य सरकारने अविवाहितांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात या विषयी सरकार ठोस निर्णय घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल असे कोणते राज्य आहे जे अविवाहितांना पेन्शन देणार आहे? यामागची नेमकी कारणे काय? अविवाहितांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे की त्यांना पेन्शनची आवश्यकता आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.

Read More

Toor Dal Price: तुरीची दरवाढ थांबणार! आफ्रिका आणि म्यानमारमधून करणार आयात

भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर डाळीच्या किमतीत सरासरी 25% वाढ झाली आहे. सध्या घाऊक बाजारपेठेत तुड डाळ 128-130 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुरीच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिक हैराण असून भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात होती. यावर केंद्र सरकारच्या आखत्यारीत येणाऱ्या ग्राहक व्यवहार विभागाने तूर डाळीच्या आयातीचा निर्णय घेतला आहे.

Read More

LPG Cylinder Price: जुलै महिन्यात एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला की महाग? जाणून घ्या

LPG Cylinder Price : महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच आज 1 जुलै रोजी एलपीजी (LPG) सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. या नव्या दरानुसार एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत घरघुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा दर काय असेल, जाणून घेऊयात.

Read More

Small Saving Scheme: अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल; PPF, KVP, SCSS योजनांचे व्याजदर जैसे थे!

Small Saving Scheme: केंद्र सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदरांमध्ये 10 ते 30 बेसिस पॉईंटने वाढ केली. हे नवीन दर जुलै-सप्टेंबर, 2023 या तीन महिन्यांसाठी राहणार आहेत. हे नवीन दर लगेच उद्यापासून म्हणजे 1 जुलै, 2023 पासून लागू होतील.

Read More

How to Sell Gold: घरातील सोने विकायचा विचार करत आहात? त्यापूर्वी या गोष्टी आवर्जुन चेक करा

How to Sell Gold: आपल्याला जेव्हा पैशांची खूपच तातडीने गरज असते. तेव्हा आपण पैसे मिळवण्याचे विविध पर्याय तपासून पाहतो. तेव्हा आपल्याकडे असलेले सोने विकायचे की, ते सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घ्यायचे. पण हे सर्व करत असताना काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे.

Read More

Green Chilli Price Hike: टोमॅटो, कोथिंबीरीनंतर हिरवी मिरची महागली, तिखट महागाईचा सर्वसामन्यांना फटका!

30 ते 40 रुपये किलो दराने घाऊक बाजारात मिळणारी हिरवी मिरची आता 60-80 रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. मुंबई, ठाणे परिसरात हे भाव 100-120 रुपये किलो पर्यंत पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. हिरवी मिरची ही भारतीय स्वयंपाक घरातील नित्याची जिन्नस आहे. वाढत्या मिरचीच्या दरामुळे सामान्य नागरिकांचे स्वयंपाकाचे बजेट बिघडलेले पाहायला मिळते आहे.

Read More

2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 90 हजार व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मुद्दलही परत मिळवा, जाणून घ्या कालावधी

Post Office Saving Scheme: पोस्टाच्या या बचत योजनेमध्ये 2 लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यावर 90 हजार रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. तसेच या योजनेचा कालावधी पूर्ण झाला की, मुद्दल 2 लाख रुपये देखील परत मिळणार.

Read More

Property rights : पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा किती अधिकार असतो? काय म्हणतो कायदा? जाणून घ्या

Property rights : लोकांना मालमत्तेशी संबंधित कायद्यांबद्दल माहिती नसते. अनेकदा त्यासंबंधीची माहिती नसल्यामुळे मालमत्तेशी संबंधित वादही होतात. तर जाणून घेऊया, पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा किती अधिकार असतो?

Read More