सोने आणि चांदीमधील तेजी सुरुच आहे. आज बुधवारी 11 जानेवारी 2023 रोजी सोने आणि चांदीमध्ये वाढ झाली. मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 55 रुपयांनी वाढला. चांदीमध्ये 194 रुपयांची वाढ झाली. मंगळवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज बुधवारी दुपारी 1 वाजता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55830 रुपये इतका वाढला. त्यात 118 रुपयांची वाढ झाली. चांदीमध्ये देखील आज 567 रुपयांची वाढ झाली. आज एक किलो चांदीचा भाव 68930 रुपये इतका वाढला. चांदीने आज इंट्रा डेमध्ये 69158 रुपयांची मजल मारली होती.
सराफा बाजारात 24 कॅरेटचा भाव प्रती 10 ग्रॅम 55960 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 71800 रुपये इतका आहे. काल मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 55712 रुपये आणि चांदीचा भाव 68363 रुपये इतका होता.
जागतिक कमॉडिटी बाजारात सोने 0.2% महागले आहे. अमेरिकेतीत रोजगाराची आकडेवारी समाधानकारक असल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीला पूर्ण विराम दिला जाण्याची शक्यता आहे. याचे पडसाद तेथील मार्केटमध्ये उमटले. डॉलर इंडेक्स आणि ट्रेझरी यिल्डमध्ये घसरण झाली. बुधवारी स्पॉट गोल्डचा भाव 0.2% ने वाढला असून तो 1875.01 डॉलर प्रती औंस इतका झाला. यूएस गोल्ड फ्चुचर्सचा भाव 1876.5 डॉलर इतका आहे. चांदीला मात्र नफावसुलीचा फटका बसला. चांदीचा भाव प्रती औंस 23.56 डॉलर असून त्यात 0.3% घसरण झाली.
Goodreturns या वेबसाईटनुसार सराफा बाजारात आज बुधवारी सोन्याचा भाव सरासरी 130 रुपयांची घसरण झाली. मुंबईत 22 कॅरेटचा भाव 51300 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 55960 रुपये इतका वाढला. एक किलो चांदीचा भाव 71500 रुपये इतका आहे. दिल्लीत 22 कॅरेटचा भाव 51450 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 56110 रुपये इतका खाली आला. दिल्लीत आज सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले. चेन्नईत 22 कॅरेटचा भाव 52300 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 57050 रुपये इतका आहे. त्यात 80 रुपयांची घट झाली. कोलकात्यात 22 कॅरेटचा भाव 51300 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 55960 रुपये इतका आहे.