महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक गोष्टींचे दर अपडेट होतात. आज 1 जुलै रोजी घरघुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे (Household and commercial cylinders) नवीन दर अपडेट करण्यात आले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार (IndianOil website) 14.2 किलो घरघुती एलपीजी सिलेंडर आणि 19 किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे व्यावसायिक आणि गृहिणींच्या बजेटवर या महिन्यात तरी कोणताही विशेष फरक पडणार नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सिलेंडरच्या किंमती काय? जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
मुंबईतील एलपीजी सिलेंडरचे दर जाणून घ्या
देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये घरघुती सिलेंडरसाठी 1102.50 रुपये, तर व्यावसायिक सिलेंडरचा भाव 1725 रुपयांवर स्थिर आहे. तसेच नवी दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत 1103 रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे. जून महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 83 रुपयांनी कमी झाली होती, तर मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडर ग्राहकांना 172 रुपयांनी स्वस्त मिळाला होता.
मार्च महिन्यात घरघुती सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ
गेल्या काही दिवसांपासून घरघुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्च महिन्यात घरघुती सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. ही वाढ 50 रुपयांनी केली गेली.
मागील वर्षी जुलै महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. नवी दिल्लीत घरघुती सिलेंडरची किंमत मार्च 2023 पर्यंत 1053 रुपये होती. 50 रुपयांची भाववाढ पकडून सध्याचा दर 1103 रुपये झाला आहे. मार्च 2023 नंतरच्या भाव वाढीनंतर घरघुती सिलेंडरच्या किंमती स्थिर पाहायला मिळाल्या आहेत.
व्यावसायिक सिलेंडर कधी स्वस्त झाला होता?
मे 2023 मध्ये व्यावसायिक सिलेंडर 172 रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र घरघुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. 1 जूनच्या दरम्यान व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा 83 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर राजधानीत व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती 1773 रुपयांवर पोहचल्या होत्या.
किंमती कुठे तपासाच्या?
तुम्हाला एलपीजी सिलेंडरच्या किंमती तपासाच्या असतील, तर तुम्ही https://iocl.com/prices-of-petroleum- products या वेबसाईटला भेट देऊ शकता. याठिकाणी तुम्हाला एलपीजी सिलेंडरचे नवीन दर पाहायला मिळतील.
Source: prabhatkhabar.com