Mid Segment Homes Demand: कोरोना काळात गृह कर्ज स्वस्त झाल्याने, घरांची मागणी वाढली होती. परंतु, आता कर्ज महागल्यानंतरही रियल इस्टेट सेक्टरवर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. याउलट 2023 च्या पहिल्या सहामाहीत, देशात परवडणाऱ्या घरांपेक्षा 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मिड-सेगमेंट घरांची विक्री झाली आहे. या काळात प्रीमियम घरांच्या विक्रीतही वाढ झालेली आहे. प्रॉपर्टी कसंलटेंट नाइट फ्रैंक (Knight Frank) ने इंडिया रियेल एस्टेट -रेसिडेंशियल एंड ऑफिस मार्केट जनवरी - जून 2023 असा एक अहवाल जारी केला आहे, त्याअंतर्गत ही माहिती देण्यात आली.
मिड-सेगमेंट घरांची विक्री वाढली
50 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीचा हिस्सा 2020 च्या दुसऱ्या सहामाहीत 43 टक्क्यांवरून 2023 च्या पहिल्या तिमाहीत 32 टक्क्यांवर आला आहे. या कालावधीत परवडणाऱ्या विभागातील घरांची विक्री कमी होत आहे, तरीही 2022 च्या पहिल्या सहामाहीपर्यंत या विभागाची विक्री व्हॉल्यूमच्या बाबतीत सर्वाधिक दिसून येत होती. पण 2022 चा दुसरा सहामाही आणि 2023 च्या पहिल्या सहामाही मध्ये सलग परवडणाऱ्या घरांपेक्षा मिड-सेगमेंट विभागातील घरे जास्त विकल्या गेली आहेत, अशी माहिती अहवालात देण्यात आली.
1 कोटींच्या घरांनाही मागणी
नाईट फ्रँकच्या या अहवालानुसार, याच कालावधीत वार्षिक विक्रीत ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या किंमतीच्या श्रेणीतील मिड-सेगमेंट मधील घरांचा हिस्सा ३६ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर 1 कोटी घरांच्या विक्रीतील हिस्सा 21 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. अहवालानुसार, कोविड महामारीचा परिणाम उच्च उत्पन्न गटावर दिसला नाही. उलट, भावनात्मक्ता, उच्च बचत दर आणि लॉकडाऊन यांनी घरांची मागणी वाढवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.
मुख्य शहरांमध्ये भाव वाढ
2023 च्या पहिल्या तिमाहीत विक्रीचे प्रमाण स्थिर राहिले आहे, परंतु देशातील आठ प्रमुख शहरांमधील घरांच्या किमती 2 ते 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्यामध्ये मुंबईत ६ टक्के आणि दिल्ली, बेंगळुरूमध्ये ५ टक्क्यांनी भाव वाढले आहेत. गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ झाली असली, तरी निवासी बाजारपेठेत मागणी वाढताना दिसत आहे, असे नाइट फ्रँकच्या अहवालात म्हटले गेले आहे.