भारतात गेल्या एकाही वर्षांपासून लग्नसंस्थेविषयी वेगवगेळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आजची तरुण पिढी उशिराने लग्न करण्याचा निर्णय घेताना दिसते आहे. करिअर आणि लग्न यामध्ये समतोल साधने युवा वर्गाला कठीण होऊन बसले आहे. बदलत्या नागरी शैलीमुळे देखील विवाहाच्या, घटस्फोटाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशातच वाढत्या बेरोजगारीमुळे देखील ग्रामीण भागातील तरुणांना विवाहासाठी मुली मिळत नसल्याची देखील प्रकरणे समोर आली आहेत.
अशातच भारतातील एका राज्य सरकारने अविवाहितांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात या विषयी सरकार ठोस निर्णय घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल असे कोणते राज्य आहे जे अविवाहितांना पेन्शन देणार आहे? यामागची नेमकी कारणे काय? अविवाहितांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे की त्यांना पेन्शनची आवश्यकता आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.
#BreakingNews #Haryana #cm #pension #Manohar_Lal_Khattar #motorolaRazr40Ultra #JawanTrailer #MissionImpossible #OMG2 #HarbhajanSingh pic.twitter.com/tX0SDbpcpn
— Breaking News हिंदी समाचार (@im_BreakingNews) July 3, 2023
लग्न न झालेल्या स्त्री आणि पुरुषांना अशी पेन्शन योजना आणण्याची योजना हरियाणा सरकारने सुरू केली आहे. 45 ते 60 वर्षे वयोगटातील अविवाहितांना पेन्शन देण्याची सरकारची योजना आहे, ज्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांनाही लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पेन्शनची किती रक्कम देण्यात येईल आणि त्याचा कशाप्रकारे फायदा घेता येईल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. येत्या महिनाभरात यावर निर्णय घेण्यात येईल असे हरियाणाचे मुख्यमंत्री व भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले आहे.
पेन्शनसाठी अट काय?
एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ही घोषणा केली आहे. हो योजना 45 ते 60 वर्षे वयोगटातील अविवाहित महिला आणि पुरुषांसाठी असणार आहे. लाभार्थी हे हरियाणा राज्याचे रहिवासी असावे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाखांपेक्षा अधिक नसावे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
देशभरात चर्चा
हरियाणा सरकारने अविवाहितांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सव्वा लाख अविवाहितांना फायदा होणार आहे असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.