शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीला लागल्यानंतर मिळणारा पहिला पगार खास असतो. अनेकजण पहिला पगार झाल्यानंतर कुटुंब, मित्र-मैत्रिणींना पार्टी देतात. तर काहीजण खास भेटवस्तू खरेदी करतात. पहिल्या पगारातील रक्कम गुंतवण्यासाठी खूप कमी लोक प्राधान्य देतात. मात्र, पहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढा अधिक फायदा भविष्यात मिळेल.
तुम्ही देखील नोकरीला लागल्यानंतर कशात गुंतवणूक करावी याचा विचार करत असाल तर, या लेखातून गुंतवणुकीचे असेच काही सुरक्षित पर्याय जाणून घेऊयात.
हे देखील वाचा - Investment : कमी पैशात गुंतवणूक करायची आहे; तर 'हे' पर्याय बेस्ट ठरू शकतात
लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणे गरजेचे
कमी वयात गुंतवणुकीला सुरुवात केल्यास भविष्यात त्याचे अनेक फायदे मिळतात. नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी. लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात केल्यास चक्रवाढीचा सर्वाधिक फायदा मिळतो. याशिवाय, जोखीम स्विकारण्याची क्षमता देखील निर्माण होते. एखाद्या गुंतवणुकीत नुकसान झाले असल्यास ते भरून काढण्याची संधी मिळते.
याशिवाय, निवृत्तीचा विचार करूनही आतापासून गुंतवणुकीला सुरुवात केल्यास फायदा होईल. करिअरच्या सुरुवातीला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे टाळा. तसेच, करबचतीसाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधा.
हे देखील वाचा - Investment Options: निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी? जाणून घ्या
गुंतवणुकीचे हे पर्याय आहेत सुरक्षित
पीएफ | दरमहिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. याशिवाय, कंपनीकडून देखील तेवढीच रक्कम दिली जाते. अनेक कंपन्यांमध्ये पीएफची रक्कम वाढविण्याची सुविधा मिळते. पीएफची रक्कम वाढवल्यास जास्त बचत होईल व भविष्यात या बचतीचा फायदा मिळेल. |
सोने | सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे नोकरीला लागल्यानंतर पैशांची बचत करून सोने खरेदी करू शकता. तुम्ही घरातील महिलांसाठी दागिने खरेदी करू शकता. अथवा डिजिटल सोन्यात देखील गुंतवणुकीचा चांगला पर्याय उपलब्ध आहेत. |
स्टॉक्स | तुम्ही पगारातील ठराविक रक्कम स्टॉक्समध्ये गुंतवू शकता. स्टॉक्समधील गुंतवणूक ही जोखमीची ठरू शकते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी गुंतवणुकीत विविधता असणे आवश्यक आहे. |
म्युच्युअल फंड | म्युच्युअल फंड देखील करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक सुरू करण्यासाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही अवघ्या 500 रुपयांपासून यात गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. यात केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. |
विमा | नोकरीला लागल्यानंतर सर्वातआधी स्वतःचा व कुटुंबाचा जीवन/आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे. विमा काढल्याने वैद्यकीय उपचारांवर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचवू शकता. |
इमर्जेन्सी फंड | पगारातील काही रक्कम इमर्जेंन्सी फंडमध्ये जमा करणे आवश्यक आहे. भविष्यात नोकरी गेल्यास, अचानक वैद्यकीय खर्च करावा लागल्यास अशावेळी इमर्जेन्सी फंडमधील रक्कम उपयोगी येते. |
हे देखील वाचा - Personal Investment Tips : बचतीचे 'हे' पाच नियम फॉलो केल्यास आयुष्य होईल सुखकर