How to Sell Gold: सोने हे सुरक्षित कर्ज मानले जाते. जे तु्म्ही गहाण ठेवून त्याबदल्यात रोख रक्कम मिळवू शकतो. यामध्ये तुम्ही सोन्याचे दागिने, गोल्ड कॉईन किंवा गोल्ड बार हे तारण ठेवू शकता. अल्प मुदतीकरीता कर्ज घेण्याचा हा एक लोकप्रिय आणि नियमित मार्ग आहे. यामध्ये सोन्याच्या वस्तुचे मूल्य आणि त्याची किंमत ठरवून, तपासून त्यावर आधारित जलदगतीने कर्ज दिले जाते. इतर कर्जांच्या तुलनेत सोने तारण ठेवून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि वेगवान मानली जाते. त्यामुळे सोन्याला नेहमीच मागणी आणि पुरवठा असतो.
Table of contents [Show]
सोने विकायचे की तारण ठेवायचे
साधारणत: सोने विकायचे की तारण ठेवायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यानुसार त्याने तो निर्णय घेणे योग्य आहे. सोने विकून त्यावर लगेच पैसे तुम्हाला मिळू शकतात. पण त्यामुळे तुमचा त्यावरील हक्क देखील संपतो. तर दुसरा पर्याय म्हणजे ते सोने विशिष्ट कालावधीसाठी तारण ठेवून, ते पुन्हा मिळवता येते. मग अशावेळी सोने गहाण ठेवून त्यावर कर्ज घेणे उचित ठरू शकते.
पण तारण किंवा गहाण ठेवलेले सोने पुन्हा मिळवायचे असेल तर त्याचे व्याज आणि मासिक हप्ता नियमितपणे भरणे आवश्यक आहे. अशाप्रकारे सोने विकायचे की, गहाण ठेवायचे याचा निर्णय घेताना आपले आर्थिक नियोजन आणि वैयक्तिक गरजा लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच आपण जे कर्ज घेत आहोत. ते अल्पकालीन योग्य आहे की दीर्घकाळासाठी घेतल्याने त्याचा फायदा होऊ शकतो. हे सुद्धा पाहिले पाहिजे.
सोन्याच्या बाजारावर लक्ष ठेवा
जर तुम्ही सोने विकण्याचा निर्णय घेतला असेल तर, ते विकण्यापूर्वी सराफा मार्केटमधील सोन्याचा दर जाणून घ्या. तसेच तुमच्या जवळ जे सोने आहे; त्याचे मूल्य/किंमत जाणून घ्या.कारण सोने गहाण ठेवताना किंवा त्याची विक्री करताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बऱ्याचदा सोन्याचा त्या दिवसाचा दर, त्याचे वजन आणि आणि कॅरेट यानुसार कर्जाची रक्कम ठरते. त्यामुळे सोने विकताना सोन्याच्या बाजारावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
सोन्याची शुद्धता आणि वजन तपासा
जे पिवळ्या धातुचे असते, ते सर्वच सोन्याचे असते असे नाही. सोन्याच्या शुद्धतेचे 3 ते 4 प्रकार असतात. त्याला कॅरेट म्हणतात. 24 कॅरेटचे सोने 100 टक्के शुद्ध मानले जाते. तर 22, 23, 18 कॅरेटचेदेखील सोने असते. अनेकवेळा सोन्याच्या वजनामध्येही ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे सोने विकण्यापूर्वी त्याची शुद्धता आणि वजन जाणून घेणे आवश्यक आहे.
सोने विकण्याची प्रक्रिया समजून घ्या
तुम्ही सोने विकण्याचा निर्णय घेतला असेल तर ते सोने कशाप्रकारे विकले जाते, त्याची प्रक्रिया समजून घ्या. तुम्हाला ती प्रक्रिया अगोदरच माहिती असेल तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी होऊ शकते. तसेच तुम्ही खात्रीशीरपणे या प्रक्रियेला सामोरे जावू शकता. साधारणत: सोने अधिकृत विक्रेत्यांनाचा विकावे. त्यांच्याकडे सोने विकण्यासाठी नेताना त्याच्या खरेदीची पावती सोबत न्यावी. त्यावर त्याचा मूळ भाव प्रत्यक्ष सोन्याचे वजन, त्याची किंमत, मजुरीचा खर्च आदी गोष्टी नमूद केलेल्या असतात.
अशाप्रकारे तुम्ही काही बेसिक गोष्टींची माहिती घेऊन सोने विकायचे की, गहाण ठेवायचे याचा निर्णय घेऊ शकता. ही प्रक्रिया तुम्हाला अगोदरच माहित असेल तर तुम्ही या प्रक्रियेला विश्वासाने सामोरे जाऊ शकता आणि यात तुमची कोणी फसवणूकही करू शकणार नाही.