• 07 Dec, 2022 09:23

Children's Day 2022: किड्स सेव्हिंग अकाउंट का आहे गरजेचे, जाणून घ्या

Kid's Saving Account, Children's Day 2022, Kid's Investment Option

Children's Day 2022:आर्थिक शिस्त लहानपणापासून अंगी बाळगणे गरजेचे आहे. या वयात लहान मुलांवर याचे संस्कार केले तर पुढे जाऊन त्यांना ते फायदेशीर ठरू शकते. याची अगदी पहिली पायरी म्हणजे Kid's Saving Account (लहान मुलांचे बचत खाते) सुरू करणे.

आर्थिक साक्षरतेचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक शिस्त लहानपणापासून अंगी बाळगणे गरजेचे आहे. या वयात लहान मुलांवर याचे संस्कार केले तर पुढे जाऊन त्यांना ते फायदेशीर ठरू शकते. याची अगदी पहिली पायरी म्हणजे Kid's Saving Account (लहान मुलांचे बचत खाते) सुरू करणे. किड्स सेविंग अकाउंट्सचे स्वरुप कसे असते आणि असे अकाऊंट काढणे का गरजेचे आहे, हे आपण या लेखातून बघणार आहोत.

किड्स सेव्हिंग अकाऊंटचे स्वरुप

10 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बँका किड्स सेव्हिंग अकाउंटची सुविधा उपलब्ध करून देतात. यावर होणाऱ्या व्यवहारांची जवाबदारी पालकांवरच असते. मूल 18 वर्षाचे झाल्यावर ते प्रौढ वयोगटात राहेल. यामुळे इतर खात्यांप्रमाणे या खात्याचे व्यवहार मूले स्वत: करु शकतात. या प्रकारच्या खात्यामुळे बँकेत बचत खाते उघडण्यास 18 वर्षांपर्यंत थांबण्याची आवश्यकता लागत नाही.

पैसे गुंतवले तर वाढतात हा लहानपणीच संस्कार

लहान मुलांसाठी बचतीसाठी पिगी बँकेचा पर्याय (Piggy Bank) दिला जातो. पालकांनी किंवा पाहुणे जाताना खाऊसाठी म्हणून जे पैसे देतात ते पैसे ही मुलं पिगी बँकेत जमा करतात. ही सुद्धा मुलांना बचतीची सवय लागावी यासाठी चांगली गोष्ट आहे. पण खाऊच्या गल्ल्यातले पैसे वाढत नाहीत. म्हणून गल्ल्यात एक ठराविक रक्कम साठल्यावर ती जर या सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा केली तर त्यावर व्याजही मिळते. यातून पैसे घरात ठेवले तर तेवढेच राहतात. महागाई मात्र एकबाजूने वाढतच असते. म्हणून गुंतवणूक का आवश्यक असते, याचा एक नकळत संस्कार मुलांवर लहानपणीच होतो.  

मुलांना आर्थिक व्यवहारांची तोंड ओळख होते  

किड्स सेव्हिंग अकाउंटवर पालकांचे लक्ष असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना बँकेच्या व्यवहारांशी तोंड ओळख होते. यामुळे भविष्यात पाल्याला आर्थिक व्यवहारांविषयी कुतूहल वाढू शकते. यातून पाल्याची भविष्यातील आर्थिक समज चांगली होऊ शकते. तुमच्या पाल्ल्याचे बँकेत अकाऊंट आहे का? नसल्यास तुम्ही याचा विचार करू शकता. मात्र यावर तुमचे लक्ष असणे मात्र आवश्यक आहे.