Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property in Minor’s Name: अल्पवयीन मुलांच्या नावाने मालमत्ता खरेदी करता येते का? वाचा

Property Buying Guide

Image Source : https://www.freepik.com/

अनेक पालक अल्पवयीन मुलाच्या नावाने संपत्ती खरेदी करण्याचाही विचार करतात. मात्र, भारतात अल्पवयीन व्यक्ती संपत्ती खरेदी करता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

पालकांच्या नावावरील संपत्ती वारसा हक्काने मुलांना प्राप्त होत असते. याशिवाय, पालक देखील मुलांच्या सुखरूप भविष्यासाठी मालमत्ता त्यांच्या नावावर करतात अथवा वारस म्हणून मृत्यूपत्रात त्यांचे नाव नमूद केलेले असते. अनेक पालक अल्पवयीन मुलाच्या नावाने संपत्ती खरेदी करण्याचाही विचार करतात. मात्र, भारतात अल्पवयीन (Minor) व्यक्ती संपत्ती खरेदी करता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. या लेखातून अल्पवयीन मुलांच्या नावावर संपत्ती खरेदी करणे शक्य आहे का? तसेच, मुलाच्या नावावर संपत्तीची नोंदणी कशी करावी? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

अल्पवयीन मुलाच्या नावाने मालमत्ता खरेदी करता येते का?

अल्पवयीन व्यक्ती थेट स्वतः मालमत्ता खरेदी करू शकत नाही. 18 वर्षांखालील व्यक्तीला मालमत्ता खरेदी करणे व त्याचे व्यवस्थापन करता येत नाही. मात्र, मुलांच्या नावाने पालक मालमत्ता खरेदी करू शकतात. मुलं 18 वर्षांची होईपर्यंत मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही पालकांची असते.

Property Act of 1882 नुसार, अल्पवयीन व्यक्ती स्वतः मालमत्ता खरेदी करू शकत नसले तरीही पालक मात्र विविध माध्यमातून मुलांना संपत्तीचे मालक बनवू शकतात. पालक स्वतः मालमत्ता खरेदी करून मुलांना भेट स्वरुपात देऊ शकतात. अल्पवयीन व्यक्तीकडे केवळ भेट स्वरुपात दिलेल्या मालमत्तेचीच मालकी असेल. अल्पवयीन व्यक्ती भेट स्वरुपात मिळालेल्या मालमत्तेची कायदेशीर मालक असली तरीही त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पालकांची असते.

मुलं मालमत्तेशी संबंधित करारात सहभागी होऊ शकत नाही. त्यांच्यावतीने मालमत्ता भाड्याने देणे, विक्री करणे अशा गोष्टी कायदेशीर पालक करत असतात. मुलांनी कायदेशीर वय पूर्ण केल्यानंतर योग्य प्रक्रिया करून मालमत्तेची संपूर्ण मालकी त्यांच्याकडे हस्तांतरित करता येते.

या मालमत्तेवर कर भरावा लागतो का?

कायद्यानुसार, अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर दोनपेक्षा जास्त मालमत्ता नसेल. भेटवस्तू दिलेल्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. मात्र, पालकांच्या देखरेखेखाली मालमत्ता भाड्याने दिल्यास त्यातून मिळणाऱ्या भाड्यावर कर भरावा लागतो. तसेच, मुलांच्यावतीने पालक मालमत्ता खरेदी करत असले तरीही अशी मालमत्ता खरेदी करण्यासाठीचा पैसा हा अल्पवयीन मुलांचाच असायला हवा.

अल्पवयीन मुलाच्या नावावरील मालमत्तेची विक्री करता येते का?

अल्पवयीन मुलाच्या नावावरील मालमत्तेचे संपादन केवळ पालक करू शकतात. अशा मालमत्तेची विक्री करणे, गहाण ठेवणे, इतरांना भेट देणे हे केवळ न्यायालयाच्या परवानगीनेच करणे शक्य आहे. तसेच, मुलांनी 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालक मालमत्तेची मालकी त्यांच्याकडे हस्तांतरित करू शकतात.