Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Stamp Duty Concession Maharashtra: गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाला चालना, राज्य सरकारची स्टॅम्प ड्युटीवर सवलत

Stamp Duty In Maharashtra: राज्यातल्या प्रमुख शहरांमधील हजारो सहकारी गृहनिर्माण संस्था पुनर्विकासासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुनर्विकासातील नव्या घरांसाठीची स्टॅम्प ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Resale Property: जुने घर किंवा फ्लॅट खरेदी करताना प्रॉपर्टीच्या वयाचा करा विचार, टाळा संभाव्य नुकसान…

अनेकदा मोक्याच्या ठिकाणी एखादी प्रॉपर्टी मिळत असताना खरेदीदार त्या वास्तूच्या वयाकडे कानाडोळा करतात. तुमच्या पसंतीच्या ठिकाणी मालमत्तेचा तात्काळ ताबा मिळू शकतो म्हणून घाई करतात. रिअल इस्टेट तज्ञ सांगतात की अनेक प्रसंगी जुने घर घेणे फायदेशीर ठरते. मात्र, जुने घर घेताना अनेक बाबी तपासून घ्याव्यात, अशा सूचना सर्व तज्ज्ञांनी देणे गरजेचे आहे. ज्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे प्रॉपर्टीचे वय.

Read More

Pulses and Lentils Price Hike : डाळी आणि कडधान्यांच्या किमती वाढल्या, किरकोळ महागाई दरात वाढ

दिवसेंदिवस डाळी आणि कडधान्यांच्या किमती वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक भार पडत आहे. सामन्य नागरिकांचे स्वयंपाकाचे बजेट बिघडले असल्यामुळे सरकारने वाढत्या किमती नियंत्रित ठेवाव्यात अशी सामान्य नागरिक मागणी करत आहेत.

Read More

RBI Floating Rate Savings Bonds: बँक एफडी पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या आरबीआय बचत रोखे बाबत जाणून घ्या

RBI Bonds Give Higher Returns: गुंतवणुकीवर गॅरंटीड रिटर्न आणि अधिक नफा मिळवायचा असेल तर कुठे गुंतवणूक करणे योग्य ठरेल? असा प्रश्न जर का तुम्हाला पडत असेल तर आरबीआयच्या बचत रोखे (Savings Bonds of RBI) बाबत जाणून घ्या.

Read More

Gold Buying Rules: परदेशामधून सोने खरेदी करण्यास सरकारने केलेत 'हे' नियम लागू

Gold Buying From Foreign Countries: भारतात सोन्याचा संबंध संस्कृती आणि धार्मिकतेशी जोडल्या गेला आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याला प्रचंड महत्व दिल्या जाते. भारतातील अनेक नागरिक परदेशातूनही सोन्याची खरेदी करतात. मात्र आता सरकारने काही दागिने आणि सोन्याच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. सोन्याची उत्पादने मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य परवाना आवश्यक असणार आहे.

Read More

Housing prices : पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारात मोठी वाढ; घरांच्या किमती 11 टक्क्यांनी वाढल्या

पुण्यात मागील एक वर्षात घरांच्या किमतीमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पुण्यात प्रति चौरस फूटसाठी 5782 रुपये इतका दर झाला आहे. जो जून 2022 मध्ये 5,208 रुपये प्रति चौरस फूट इतका होता. चांगल्या मागणीमुळे पुण्यातील घरांची सरासरी किंमत वाढली असल्याची माहिती रिअल्टी फर्म गेरा डेव्हलपमेंट्सच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे.

Read More

PMAY Income Cap Rise: घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, PMAY योजनेतील उत्पन्न मर्यादा वाढवली

PMAY Income Cap Rise: प्रधान मंत्री आवास योजनेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केली होती. ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. या निर्णयाने खासकरुन मुंबई, पुणे, नागपूर या शहरांतील आर्थिक दुर्बल घटकातील ग्राहकांना फायदा होणार आहे.

Read More

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्राला संजीवनी, गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ…

खाजगी इक्विटी गुंतवणुकीत, बहुतेक गुंतवणूकदारांनी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि हैदराबादला पसंती दिल्याचे दिसते आहे. व्यावसायिक आणि कार्यालयीन मालमत्तांची खरेदी-विक्री जास्त झाली असल्याने, या शहरांत उद्योगवाढीसाठी मालमत्तांची खरेदी विक्री होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. या तीन शहरांत रिअल इस्टेटमधील खाजगी इक्विटी गुंतवणूक 63% इतकी नोंदवली गेली आहे.

Read More

Garlic Price Hike: टोमॅटो आणि जिऱ्यानंतर लसणाचे वाढले भाव, स्वयंपाकघराचं बजेट बिघडलं

बाजारात लसणाची आवक घटल्यामुळे लसणाचे भाव वाढले आहेत. मुंबई, पुण्यात, ठाण्यात तर 50% हून कमी आवक झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षीचा अवकाळी पासून आणि लांबलेला उन्हाळा. फेब्रुवारी-मार्च मध्ये महाराष्ट्रात आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते. त्यामुळे उत्पन्न कमी निघाले आहे.

Read More

Gold Demand : भारतात आर्थिक साक्षरता वाढल्याने सोन्याच्या मागणीवर परिणाम - जागतिक सुवर्ण परिषद

भारत हा जगातील सर्वात मोठी सोन्याचे बार आणि नाण्यांची बाजारपेठ असलेला देश म्हणून ओळखला जातो. मात्र,अलीकडच्या काळात देशातील, गुंतवणुकीचे वाढलेले पर्याय, आर्थिक साक्षरता आणि सरकारी नियमांमुळे सोन्याच्या मागणीवर प्रचंड परिणाम झाला आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने (World Gold Council -WGC) आपल्या ताज्या अहवालात याबाबतचे मत नोंदवले आहे.

Read More

Gold Making Charge: गोल्ड मेकिंग चार्ज म्हणजे काय? तो कसा ठरविला जातो?

Gold Making Charge: सोन्याचे दागिने सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. तुम्ही जेव्हा ज्वेलर्सच्या दुकानात सोन्याचे दागिने तयार करायला जाता. तेव्हा मेकिंग चार्जच्या नावाखाली अनेक वेळा ज्वेलर्स मानमानी पैसे घेतात. कारण देशात मेकिंग चार्ज निश्चित करण्याचे कोणतेही एक धोरण नाही. जाणून घेऊया गोल्ड मेकिंग चार्ज म्हणजे काय? आणि तो कसा ठरविला जातो?

Read More

Fixed Deposit: मुदत ठेवीत गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये दिल्ली आणि महाराष्ट्र आघाडीवर…

RBI च्या आकडेवारीनुसार, एफडीमध्ये सर्वाधिक रक्कम गुंतवणारे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांनी एफडीमध्ये 25.14 लाख कोटी रुपये गुंतवले आहेत, इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल 10.97 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह दिल्ली एनसीआरचा नंबर आहे. तर कर्नाटक 8.17 लाख कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Read More