Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property rights : पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा किती अधिकार असतो? काय म्हणतो कायदा? जाणून घ्या

Property rights

Property rights : लोकांना मालमत्तेशी संबंधित कायद्यांबद्दल माहिती नसते. अनेकदा त्यासंबंधीची माहिती नसल्यामुळे मालमत्तेशी संबंधित वादही होतात. तर जाणून घेऊया, पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा किती अधिकार असतो?

Property rights : लोकांना मालमत्तेशी संबंधित कायद्यांबद्दल माहिती नसते. अनेकदा त्यासंबंधीची माहिती नसल्यामुळे मालमत्तेशी संबंधित वादही होतात. लोकांना त्यांचे हक्क आणि त्यांच्याशी संबंधित नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. पतीच्या मालमत्तेमध्ये पत्नीच्या अधिकारांशी संबंधित मुद्दा हा देखील मालमत्तेच्या विभाजनाशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जाणून घेऊया, पती आणि सासरच्या मालमत्तेत पत्नीचा काही अधिकार आहे का? आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत? 

कायदेशीर तरतूद काय आहे? 

ज्या व्यक्तीशी महिलेचे लग्न झाले आहे, तिच्याकडे स्वत:ची कोणतीही मालमत्ता असेल, तर याबाबतचे नियम व कायदे स्पष्ट आहेत. एखाद्या व्यक्तीची स्व-अधिग्रहित मालमत्ता, मग ती जमीन, घर, पैसा, दागदागिने किंवा इतर काहीही असो, ज्याने ती मालमत्ता घेतली आहे त्या व्यक्तीची पूर्ण मालकी असते. तो आपली मालमत्ता विकू शकतो, ती गहाण ठेवू शकतो, इच्छापत्र लिहू शकतो, एखाद्याला दान करू शकतो. यासंबंधीचे सर्व अधिकार त्याच्याकडे राखीव आहेत.

पती हयात असताना मालमत्तेवर दावा करू शकत नाही 

खादी स्त्री तिच्या पतीने त्याच्या हयातीत मिळवलेल्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही. पत्नीला त्याच्या मालमत्तेत सह-मालक म्हणून जोडणे हे पतीवर अवलंबून आहे. जर पती मरण पावला आणि त्याने मृत्युपत्रात पत्नीचे नाव जोडले नाही आणि मालमत्ता दुसऱ्याला दिली, तर अशा परिस्थितीतही पत्नीचा संपत्तीवर अधिकार नाही. एकूणच, पतीला त्याच्या अधिग्रहित मालमत्तेच्या मालकीशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

सामान्य परिस्थितीत, स्त्रीला तिच्या सासरच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो किंवा स्त्री जिवंत असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेवर कोणताही दावा करू शकत नाही. सासू आणि सासरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेमध्ये पतीचा हक्क मिळत नाही, परंतु प्रथम पतीचा आणि नंतर सासूचा मृत्यू झाल्यास स्त्रीला मिळते. त्यासाठी सासू-सासऱ्यांनी मृत्युपत्र करून मालमत्ता दुसऱ्या कोणाला दिलेली नसावी, हे आवश्यक आहे.

पतीच्या मृत्यूवर पत्नीचे मालमत्ता अधिकार

जेव्हा एखादी व्यक्ती स्व-अधिग्रहित मालमत्तेसाठी मृत्युपत्र न लिहिता मरण पावते, तेव्हा सामान्य कायदा त्याच्या मालमत्तेवरील हक्काबद्दल स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत व्यक्तीची कमावलेली संपत्ती त्याच्या आई आणि विधवा पत्नीकडे जाते. येथे हे देखील आवश्यक आहे की व्यक्तीने मृत्युपत्र लिहून इतर कोणालाही मालमत्तेवर कोणताही अधिकार दिलेला नाही.

लोकमतने केलेल्या बातमीनुसार, 

27 जून रोजी लोकमतने केलेल्या बातमीनुसार, पतीने विकत घेतलेल्या मालमत्तेत पत्नीचा समान अधिकार असतो असा महत्त्वाचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिला आहे. पती घराबाहेर नोकरी करत असताना मुलांना सांभाळणे, स्वयंपाक, साफसफाई, इतर नियोजन अशा असंख्य गोष्टी पत्नी घरात करत असते. त्यामुळे पत्नीच्या कामाला पतीच्या कामाहून कमी लेखता येणार नाही असा आदेश न्यायमूर्ती कृष्णन रामसामी यांनी दिला. 

Source : www.abplive.com