Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

LIC Dividend:'एलआयसी'ने केंद्र सरकारला दिला 1831 कोटींचा लाभांश

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केंद्र सरकारला नुकताच 1,831.09 कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे डिव्हीडंडचा चेक प्रदान करण्यात आला.

Read More

TATA Steel and Uk GOVT Agreement: टाटा स्टीलचा युके गव्हर्नमेंटसोबत 10,642 कोटींचा करार

टाटा स्टीलच्या नियोजित प्लांटसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी (infrastructure) टाटा स्टीलने ब्रिटिश सरकारसोबत करार केला आहे. टाटा स्टीलने त्यांच्या युकेमधील प्लांटसाठी आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करायचे ठरविले असून त्याकामी सहकार्य करण्यासाठी तेथील गव्हर्मेंटने तयारी दर्शविली आहे.

Read More

Free Trade Agreement : भारत आणि कॅनडा दरम्यान मुक्त व्यापार कराराची चर्चा स्थगित

कॅनडामधील काही राजकीय घडामोडींमुळे कॅनडा-भारत FTA चर्चा रखडली आहे असे सांगण्यात येत आहे. भारताने असा करार करण्यास पहिल्यापासूनच सकारात्मकता दाखवली होती. मात्र कॅनडामधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील राजकीय कुरघोडीमुळे हा विषय सध्या चर्चिला जाऊ शकत नाही असे सूत्रांनी म्हटले आहे.

Read More

Aviation Industry: देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्यांच्या संख्येत 22.81% वाढ, Indigo Airlines ला सर्वाधिक पसंती

विमानाने प्रवास करणारे प्रवाशी भाववाढीची तक्रार करत असताना, विमान प्रवासाला विकल्प शोधत नाहीयेत असे दिसते आहे. 14 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात देशभरात 1.24 कोटी प्रवाशांनी देशांतर्गत विमानाने प्रवास केला. गेल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये ही आकडेवारी 1.01 कोटी इतकी नोंदवली गेली होती. म्हणजेच यंदा 23 लाख प्रवाशांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Read More

eCourts Project: भारतातील न्यायालये पेपरलेस होणार; 7 हजार कोटींच्या eCourts प्रकल्पाला कॅबिनेटची मंजूरी

इ-कोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय कॅबिनेटने नुकतीच मंजूरी दिली. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 7 हजार 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याअंतर्गत न्यायव्यवस्था हायटेक करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. डिजिटल कोर्ट म्हणजे काय? जाणून घ्या.

Read More

Marathwada Cabinet Meeting: राज्य सरकारची मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींची घोषणा

Marathwada Cabinet Meeting: सध्या सत्तेत असलेल्या तीन पक्षांच्या सरकारने आज (दि. 16 सप्टेंबर) संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतून मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज देणार, अशी चर्चा रंगली होती. त्यानुसार सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी 59 हजार कोटींच्या विविध योजनांना मंजुरी दिली.

Read More

मुंबईतील Bade Miya आणि अन्य हॉटेल्सवर FDA ची कारवाई, हे आहे कारण…

FDA च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता हॉटेल्सच्या किचनमध्ये अधिकाऱ्यांना झुरळ आणि उंदीर आढळून आले होते. FDA च्या नियमानुसार ग्राहकांना मिळणारे खाद्य सुरक्षित, स्वच्छ आणि ताजे असावे असा नियम आहे. या नियमांना हॉटेल चालकांकडून दुर्लक्षित केले असल्याचा ठपका बडे मिया सोबत इतर हॉटेल्सवर ठेवण्यात आला आहे.

Read More

Fine to Google: गुगलने संमतीशिवाय ठेवले लोकेशन ट्रॅकिंग सुरू, गुगलला 7 हजार कोटींचा दंड

Fine to Google: गुगल कंपनीने ग्राहकांना त्यांच्या लोकेशन डेटावर अनधिकृतपणे कंट्रोल ठेवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या आधीही अनेकदा गुगल लोकेशन ट्रॅकिंग करत असल्याचे बोलले गेले आहे.

Read More

Toll free Ganesh Festival: गणेशोत्सवासाठी शासनाकडून सोयी सुविधांची बरसात; आता गणेशभक्तांना टोलही माफ

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना आता टोल माफ करण्यात आला आहे. 16 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना आता टोल आकारला जाणार नाही. ही सवलत मुंबई - बंगळुरु आणि मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर असलेल्या टोलनाक्यांवर लागू असणार आहे.

Read More

Windfall Tax: क्रूड ऑइलवरील विंडफॉल टॅक्स वाढवला तर एव्हिएशन इंधनावरील कर कमी

देशांतर्गत तयार होणाऱ्या पेट्रोलियम क्रूड ऑइलवरील विंडफॉल टॅक्स प्रति टन 6,700 रुपयांवरून 10 हजार करण्यात आला आहे. पेट्रोलियम कंपन्यांना बाजारातील चढउतारांमुळे अचानक नफ्यात वाढ झाल्यानंतर विंडफॉल कर वाढवला जातो.

Read More

Meesho वर ‘महा इंडियन सेविंग सेल’ सुरु, 9 रुपयांत खरेदी करता येणार स्पेशल डील्स

दिवसभरात दर दोन तासांनी काही निवडक माल या सेगमेंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲपवरूनच ग्राहकांना खरेदी करावी लागणार आहे. या डील्समध्ये ग्राहकांना गृहपयोगी सामान, सौदर्य प्रसाधने, आर्टिफिशियल ज्वेलरी, सजावटीचे सामान आदी वस्तू खरेदी करता येणार आहे आणि तेही केवळ 9 रुपयांत. आहे की नाही खास डील?

Read More

Food Inflation : सप्टेंबर महिन्यात तांदळाच्या दरात कपात होण्याची शक्यता

सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, सप्टेंबर महिन्यात वरुणराजाची कृपा होण्याची चिन्हे आहेत. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली असली तरी, सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल आणि पिकांना जीवदान मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.

Read More