भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केंद्र सरकारला नुकताच 1,831.09 कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे डिव्हीडंडचा चेक प्रदान करण्यात आला. यावेळी 'एलआयसी'चे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती उपस्थित होते.
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे अनेक भारतीय कुटुंबांच्या विश्वासाचा भाग आहे. भारतातील अनेक कुटुंब विमा , म्युच्युअल फंड, गुंतवणूक, शेअर्स अशा विविध प्रकारे जोडले गेली एक नाव आहे. एलआयसीच्या 22 ऑगस्ट रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा डिव्हीडंड मंजूर करण्यात आला.
एलआयसीची स्थापना होऊन 67 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1956 मध्ये 5 कोटीच्या प्रारंभिक भांडवलासह कंपनीने सुरुवात केली. 31 मार्च 2023 पर्यंत एलआयसीची 45.50 लाख कोटींची मालमत्ता आहे. आयुर्विमा निधी 40.81 लाख कोटी इतका आहे.
आजघडीला बाजारात अनेक इन्शुरन्स कंपन्या असतांना लोकांचा LIC वरील विश्वास कायम आहे. त्यामुळे शेअर्स , म्युच्युअल फंड , विमा पॉलिसी अशा विविध प्रकारात लोकांनी LIC मध्ये गुंतवणूक केलेली दिसते. शेअर मार्केटमध्ये एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. एलआयसीचे एजंट नेटवर्क इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.