भारतात गेल्याकाही वर्षात ऑनलाइन पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने यूपीआयच्या माध्यमातून सर्वाधिक ऑनलाइन व्यवहार केले जात आहेत. पैसे पाठविण्यापासून ते सामान खरेदी करण्यापर्यंत, प्रत्येक आर्थिक व्यवहार आता यूपीआयच्या माध्यमातून होत आहे.
यूपीआयच्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याने याचा सर्वाधिक वापर केला जातो. फिनटेक कंपन्यांकडून सातत्याने या व्यवहारांवर शुल्क आकारण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. मात्र, शुल्क आकारल्यास जवळपास 70 टक्के लोक यूपीआयचा वापर बंद करतील, असे एका सर्व्हेमध्ये समोर आले आहे.
...तर 70 टक्के लोक यूपीआयचा वापर बंद करतील
वापरण्यास सोपे व आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याने यूपीआयची लोकप्रियता वाढली आहे. यूपीआय व्यवहारांचा आकडा 100 कोटींच्या पुढेही गेला आहे. मात्र, यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारल्यास जवळपास 73 टक्के लोक याचा वापर बंद करतील, असे लोकलसर्कल्सच्या सर्व्हेमध्ये समोर आले आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार केवळ 23 टक्के लोक आर्थिक व्यवहारांवरील शुल्क भरण्यास तयार आहेत.
सर्व्हेनुसार प्रत्येकी 2 पैकी एक व्यक्ती महिन्याला कमीत कमी 10 व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून करते. तसेच, मागील वर्षभरात एक किंवा त्यापेक्षा अधिक वेळा यूपीआय व्यवहारांवर शुल्क भरावे लागल्याचा दावा 37 टक्के लोकांनी केला.
यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचे फायदे
फिनटेक कंपन्यांना फायदा | यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारल्यास याचा सर्वाधिक फायदा हा पेटीएम, गुगलपे, फोनपे सारख्या कंपन्यांना होईल. याच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते. |
सुरक्षित व्यवहार | यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारल्यास फिनटेक कंपन्या ग्राहकांना सुरक्षित सेवा पुरविण्यास बांधील असेल. व्यवहारांवरील शुल्काचा वापर चांगली सुविधा देणे, सायबर सुरक्षा व फसवणूक रोखण्यासाठी करू शकतील. |
यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचे तोटे
कॅशलेस व्यवहार कमी | यूपीआयमुळे कॅशलेस व्यवहारात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. डेबिट/क्रेडिट कार्ड, नेटबँकिंगच्या तुलनेत यूपीआयच्या माध्यमातून सर्वाधिक व्यवहार होत आहेत. त्यामुळे शुल्क आकारल्यास रोख रक्कमेच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढतील. |
लहान व्यवसायांचे नुकसान | सध्या ग्राहकांकडून यूपीआय पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु, PPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाते. भविष्यात या शुल्कात वाढ केल्यास याचा सर्वाधिक फटका लहान व्यवसायांना बसू शकतो. |
ग्राहकांना अतिरिक्त भूर्दंड | रोख रक्कमेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क नसते. याउलट यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारल्या ग्राहकांसाठी हा अतिरिक्त भूर्दंड असेल. त्यामुळे अनेकजण ऑनलाइन व्यवहार करणे टाळतील. |