Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fine to Google: गुगलने संमतीशिवाय ठेवले लोकेशन ट्रॅकिंग सुरू, गुगलला 7 हजार कोटींचा दंड

Fine to google

Fine to Google: गुगल कंपनीने ग्राहकांना त्यांच्या लोकेशन डेटावर अनधिकृतपणे कंट्रोल ठेवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या आधीही अनेकदा गुगल लोकेशन ट्रॅकिंग करत असल्याचे बोलले गेले आहे.

Fine to Google: कॅलिफोर्नियाचे ॲटर्नी जनरल रॉब बोंन्टा यांनी नुकत्याच दाखल केलेल्या एका खटल्यानुसार गुगल कंपनीने ग्राहकांना त्यांच्या लोकेशन डेटावर अनधिकृतपणे कंट्रोल ठेवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

गुगलचे लोकेशन ट्रॅकिंग

गुगल हे नेहमीच लोकेशन एक्सेस द्वारा युजर्सला ट्रेक करत असते. तुम्ही एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल फोनवर बोललात किंवा मग काही माहिती सर्च केली की फोनवर त्यासंबंधीच्या जाहिराती दिसू लागल्याचे अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतले असतील. गुगल मार्फत काही सर्व्हिसेस घेत असताना आपण आपले लोकेशन ऑन करतो आणि गुगल संबंधीचे काम संपल्यावर लोकेशन ऑफ करतो त्यानंतर आपले लोकेशन ट्रॅक होऊ नये हे अपेक्षित असते. गुगलनेही आम्ही युजरचे लोकेशन ट्रॅक करत नसल्याचे वारंवार अधोरेखित केले आहे . मात्र या खटल्यानंतर पुन्हा एकदा गुगल युजर्सच्या प्रायव्हसीवर घाला घालत असल्याचे दिसत आहे.

गुगलला 7 हजार कोटींचा दंड

दरम्यान गुगलने मात्र हे आरोप फेटाळले असून त्याविरोधात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण कॅलिफोर्नियामध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्यानुसार गुगल या प्रकरणाच्या सेटलमेंटसाठी 7 हजार कोटी रुपये देणार असल्याचे वृत्त ‘गार्डियन’ ने दिले आहे.

ग्राहकांना फटका

गुगलकडून जर खरोखर अनधिकृतपणे लोकेशन ट्रॅकिंग होत असेल तर हे निश्चितच ग्राहक हिताचे नाही. यामुळे युजर्स ची प्रायव्हसी तर धोक्यात येतेच शिवाय सातत्याने  युजरच्या इंट्रेस्टनुसार होणाऱ्या जाहिरातींच्या माऱ्यामुळे जास्तीत जास्त अनावश्यक खर्च करण्याकडे ग्राहकाची प्रवृत्ती तयार होते.