Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Marathwada Cabinet Meeting: राज्य सरकारची मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींची घोषणा

Marathwada Cabinet Meeting

Image Source : www.twitter.com/CMOMaharashtra

Marathwada Cabinet Meeting: सध्या सत्तेत असलेल्या तीन पक्षांच्या सरकारने आज (दि. 16 सप्टेंबर) संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतून मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज देणार, अशी चर्चा रंगली होती. त्यानुसार सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी 59 हजार कोटींच्या विविध योजनांना मंजुरी दिली.

Marathwada Cabinet Meeting: सध्या सत्तेत असलेल्या तीन पक्षांच्या सरकारने आज (दि. 16 सप्टेंबर) छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतून मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज देणार, अशी चर्चा रंगली होती. त्यानुसार सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी 59 हजार कोटींच्या विविध योजनांना मंजुरी दिली.

मंत्रिमंडळाने मराठवाड्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल असे निर्णय म्हणजे नदी जोड प्रकल्प आणि सिंचन. कारण मराठवाड्यात नेहमीच दुष्काळाची परिस्थिती असते. या विभागात पाण्याची योग्य सोय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसह लहान-मोठ्या उद्योग धंद्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ऐन उन्हाळ्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणीही नीट मिळत नाही. त्यादृष्टीने नदी जोड प्रकल्प आणि सिंचनासाठी निधी या दोन जमेच्या बाजू समजल्या मानल्या जात आहेत.

7 वर्षांनी मराठवाड्यात कॅबिनेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. यापूर्वी 7 वर्षांपूर्वी कॅबिनेट मिटिंग छत्रपति संभाजी नगरमध्ये झाली होती. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठवाड्यातील 35 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. यामुळे जवळपास 8 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर 14 हजार कोटी रुपये इथल्या सिंचन प्रकल्पांवर खर्च करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.