Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मुंबईतील Bade Miya आणि अन्य हॉटेल्सवर FDA ची कारवाई, हे आहे कारण…

FDA

FDA च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता हॉटेल्सच्या किचनमध्ये अधिकाऱ्यांना झुरळ आणि उंदीर आढळून आले होते. FDA च्या नियमानुसार ग्राहकांना मिळणारे खाद्य सुरक्षित, स्वच्छ आणि ताजे असावे असा नियम आहे. या नियमांना हॉटेल चालकांकडून दुर्लक्षित केले असल्याचा ठपका बडे मिया सोबत इतर हॉटेल्सवर ठेवण्यात आला आहे.

मुंबईतील प्रसिध्द अशा काही हॉटेल्सवर Food and Drug Administration (FDA) अर्थात अन्न व औषधे प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. FDA च्या अधिकाऱ्यांनी काल मुंबईतील काही हॉटेल्सवर धडक कारवाई केली असून त्यांना खाद्यान्नाच्या बाबतीत हेळसांड, अस्वच्छता आढळली आहे. त्यामुळे बडे मिया हॉटेल्ससोबत इतर काही हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील पर्यटकांच्या आणि खवय्यांच्या आवडीचे ठिकाण असलेल्या बडे मिया हॉटेलवर कारवाई झाल्याने सध्या सोशल मिडीयावर याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. हे हॉटेल अनेक बॉलीवूड सेलिब्रेटीजचे आवडते ठिकाण आहे. 

काय आहे कारण?

FDA च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता हॉटेल्सच्या किचनमध्ये अधिकाऱ्यांना झुरळ आणि उंदीर आढळून आले होते. FDA च्या नियमानुसार ग्राहकांना मिळणारे खाद्य सुरक्षित, स्वच्छ आणि ताजे असावे असा नियम आहे. या नियमांना हॉटेल चालकांकडून दुर्लक्षित केले असल्याचा ठपका बडे मिया सोबत इतर हॉटेल्सवर ठेवण्यात आला आहे.

अन्य हॉटेल्सवर कारवाई

बडे मिया सहित माहीम येथील मुंबई दरबार (Mumbai Darbar, Mahim), गोवंडी मधील क्लाउड किचन आउटलेट (Cloud Kitchen Outlet) , कृष्णा फास्टफूड, चारकोप (Krushna Fastfood, Charkop) आणि पॅराडाईज हॉटेल, बांद्रा (Paradise Hotel, Bandra) यांच्यावर देखील FDA च्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि हॉटेल्सला टाळे ठोकले आहे.

किती आकारला दंड?

बडे मिया या हॉटेलला दोन वेगवगेळ्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दंड ठोठावण्यात आला आहे. असुरक्षिततेच्या (Safety Violation) कारणास्तव 15 हजारांचा दंड आणि अस्वच्छतेच्या कारणास्तव 40 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एकूण 55 हजारांचा दंड बडे मिया हॉटेलकडून आकारण्यात आला आहे. अन्य हॉटेल्सवर देखील अशीच कारवाई करण्यात आली आहे.

सध्या पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व हॉटेल्सला त्यांचे काम थांबवण्याचे आदेश FDA कडून देण्यात आले आहेत.