टाटा स्टील कंपनी आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट यांच्यामध्ये जवळपास 10,642 कोटी रुपयांचा (1.2 बिलिअन युरो) सामंजस्य करार झाला आहे. पोर्ट टॅलबोट येथील नियोजित प्लांटसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी सहकार्य करण्यासाठी ब्रिटिश गव्हर्मेंटने तयारी दर्शविली आहे.
Table of contents [Show]
10,642 कोटी रुपयांची गुंतवणूक
टाटा स्टीलच्या 10,642 कोटी (1.2 बिलियन पौंड) इतकी मोठी गुंतवणूक असलेल्या पोर्ट टॅलबोट येथील नियोजित प्लांटसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी (infrastructure) सहकार्य करायला ब्रिटिश गव्हर्मेंटने तयारी दर्शवली आहे.
पर्यावरणपूरक स्टील निर्मिती
टाटा स्टीलचा हा प्रस्ताव ब्रिटिश गव्हर्मेंटसाठी गेल्या अनेक दशकांमधील पोलाद उद्योगातील एक मोठा गुंतवणूक प्रस्ताव असेल. या भागीदारीतून पर्यावरणपूरक पद्धतीने पोलाद विकसित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. हा करार युकेमधील पोलाद उद्योगाच्या भविष्यासाठी एक मोठे पाऊल असून जगभरात पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्पांसाठी प्रयत्न होत असतांना हा प्रकल्प त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरेल .
रोजगार निर्मिती व ग्रीन टेक्नॉलॉजी
ही गुंतवणूक उत्तम प्रकारे रोजगार निर्मिती करेल आणि साउथ वेल्स (south wells ) मध्ये ग्रीन टेक्नॉलॉजी (हरित तंत्रज्ञान ) वर आधारित इंडस्ट्रियल इकोसिस्टीमच्या विकासासाठी एक उत्तम संधी निर्माण करेल असा विश्वास टाटा स्टीलतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
शेअर होल्डर्सला फायदा
टाटांच्या युकेतील सध्याचा स्टील उद्योगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या युकेमधील व्यवसायाचे पुनरुज्जीवन हे एक मोठे पाऊल ठरणार आहे. हा निर्णय टाटा स्टीलसच्या गुंतवणूकदारांसाठीही (share holders ) फायद्याचा ठरणार आहे .
युकेसाठी स्टील सिक्युरिटी
टाटा इंडस्ट्रीजचे हे पाऊल म्हणजे युकेतील स्टील इंडस्ट्रीला डीकार्बनयझेशन (decarbonizaton ) कडे नेण्याचा एक प्रयत्न आहे. पुढील दहा वर्षात 50 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा दावा टाटा कंपनीने केला आहे.