Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Meesho वर ‘महा इंडियन सेविंग सेल’ सुरु, 9 रुपयांत खरेदी करता येणार स्पेशल डील्स

Meesho

दिवसभरात दर दोन तासांनी काही निवडक माल या सेगमेंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲपवरूनच ग्राहकांना खरेदी करावी लागणार आहे. या डील्समध्ये ग्राहकांना गृहपयोगी सामान, सौदर्य प्रसाधने, आर्टिफिशियल ज्वेलरी, सजावटीचे सामान आदी वस्तू खरेदी करता येणार आहे आणि तेही केवळ 9 रुपयांत. आहे की नाही खास डील?

मिशो या ई-कॉमर्स वेबसाइटवर सध्या एक सेल सुरु आहे. ‘महा इंडियन सेविंग सेल’ (Maha Indian Saving Sale) नावाने हा सेल 15 आणि 16 सप्टेंबर 2023 दरम्यान सुरु असणार आहे. सणासुदीचे दिवस नजीक आल्यामुळे मिशोने हा खास सेल सुरु केलाय. या सेलमध्ये लहान मुले, स्त्रिया, पुरुष आदींसाठी फेस्टिव्हल लुक कपडे, कुर्ता, एथनिक वेअर, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंवर 70-80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. या सेलचे मुख्य आकर्षण म्हणजे दर 2 तासांनी मिशोच्या अधिकृत ॲपवर ‘रु.9 डील्स’ (Rs. 9 Deals on Meesho) लाईव्ह असणार आहेत. लिमिटेड माल लिमिटेड वेळेत केवळ 9 रुपयांत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

काय असेल रु.9 डील्समध्ये?

दिवसभरात दर दोन तासांनी काही निवडक माल या सेगमेंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲपवरूनच ग्राहकांना खरेदी करावी लागणार आहे. या डील्समध्ये ग्राहकांना गृहपयोगी सामान, सौदर्य प्रसाधने, आर्टिफिशियल ज्वेलरी, सजावटीचे सामान आदी वस्तू खरेदी करता येणार आहे आणि तेही केवळ 9 रुपयांत. आहे की नाही खास डील?

याशिवाय ॲपवर ग्राहकांना 49 रुपये, 99 रुपये स्टोअर्समध्ये देखील दर दोन तासांनी खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.

फेस्टीव्ह कपड्यांवर 70% सूट 

मिशोच्या या सेलमध्ये गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, ईद या सणांच्या निमित्ताने फेस्टीव्ह लुकसाठी तुम्हांला खरेदी करता येणार आहे. तरुणाईला आकर्षक करतील अशा पारंपारिक कपड्यांच्या डिजाईन या सेलमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे महिलांसाठी 99 रुपयांपासून कुर्ती आणि सूट अवेलेबल करून देण्यात आले आहेत.

इलेक्ट्रोनिक्स वस्तू 45 रुपयांपासून सुरु

ग्राहकांना या सेलमध्ये हेडफोन, स्मार्टवॉच, स्पीकर्स, चार्जर्स, सेल्फी स्टिक आदी इलेक्ट्रोनिक्स वस्तू एकदम कमी दरात खरेदी करता येणार आहे. सेलमध्ये या सगळ्यांची किंमत 45 रुपयांपासून सुरु होते आहे. तेव्हा तुम्ही जर अशा काही धमाकेदार ऑफर्सची वाट बघत असाल तर हा सेल तुमच्यासाठीच आहे असेच समजा.