Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

BUILD competition : नवीन तंत्रज्ञानासाठी कल्पना सुचवा आणि 10 लाखांचे बक्षीस मिळवा, स्टार्टअप उद्योगांना होईल फायदा

Boing India: एयरक्राफ्ट, डिफेन्स, टेक्नोलॉजी आणि सामाजिक विषयांवर जे विद्यार्थी किंवा युवा उद्योजक काम करत आहेत अशांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी एव्हिएशन कंपनी बोईंग इंडियाने ‘BUILD’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे संपूर्ण नाव आहे, Boeing University Innovation Leadership Development. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून युवा उद्योजकांना आणि विद्यार्थ्य

Read More

Naresh Goyal Custody: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, बँक घोटाळ्याचा ठपका

Naresh Goyal Custody: कॅनरा बँकेच्या तक्रारीनंतर ईडीने मुंबई आणि दिल्लीमधील गोयल यांच्या निवासस्थानी तसेच जेट एअरवेजच्या कार्यालयांची झडती घेतली होती. याशिवाय जेट एअरवेजच्या ऑडिटर्सवर देखील छापे टाकण्यात आले होते.

Read More

Google Layoff: गुगलकडून पुन्हा नोकरकपात; मनुष्यबळ विभागातील कर्मचारी झाले बेरोजगार

आयटी जायंट गुगलने पुन्हा एकदा कर्मचारी कपाती केली आहे. यावेळी मनुष्यबळ विभागातील कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली. मागील वर्षापासून गुगलने 12 हजार कर्मचारी कपात केली. एकूण मनुष्यबळाच्या 6% नोकरकपात केली.

Read More

Health Care Inflation: आरोग्य क्षेत्रातील महागाईने सर्वसामान्य बेजार; मात्र, प्रति खाटेमागे रुग्णालयांचा नफा वाढला

परवडणाऱ्या दरात हॉस्पिटल हे आता सर्वसामान्यांसाठी स्वप्न बनलं आहे. कोरोनानंतर आरोग्य क्षेत्रातील महागाई वाढलीय. रुग्णालयांना प्रति खाटेमागे मिळणारं उत्पन्न वाढत आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होताय. रुग्णालये किती नफा मिळवत आहेत जाणून घ्या.

Read More

Wheat Prices: मिल मालकांकडून गव्हाची साठेबाजी? दरवाढ रोखण्यासाठी FCI कडून तपासणी

मागील एक महिन्यात गव्हाच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या तर एकाच आठवड्यात 3 टक्क्यांनी वर गेल्या आहेत. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. मिल मालकांनी FCI कडून खरेदी केलेल्या गव्हाची साठेबाजी तर केली नाही ना? याची तपासणी सुरू आहे.

Read More

Ganeshotsav 2023: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तीसह विविध साहित्यांच्या मागणीत वाढ, कोटींची उलाढाल

Ganeshotsav 2023: यंदा 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. गणरायाच्या आगमना करिता संपूर्ण बाजारपेठ सज्ज झाली आहे. माती, शाडू माती, पीओपी असे विविध प्रकारचे गणपती बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. यासोबतच मखर, विविध सजावटीचे साहित्य तसेच धूप, अगरबत्ती यासारख्या पूजेच्या सामानाने संपूर्ण बाजारपेठ सजली आहे.

Read More

Life Certificate : आता घरबसल्या पोस्टमनच्या मदतीने मिळवा तुमचा हयातीचा दाखला!

ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना हयातीचा दाखला मिळवणे जरा अवघड असते. कुठली कागदपत्रे द्यावी लागतात, ती कुठे जमा करावी लागतात याची माहिती अनेकांना नसते. वृद्धापकाळात तर वारंवार बँकेत जाणे देखील जमत नाही. परंतु आता मात्र टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण आता थेट तुमच्या घरापर्यंत येऊन पोस्टमन तुम्हांला हयातीचा दाखला देणार आहे.

Read More

Mumbai Biggest Land Deal: बॉम्बे डाईंगच्या वरळीतील प्रॉपर्टीसाठी 5200 कोटी रुपयांचा सौदा

Mumbai Biggest Land Deal: वाडिया ग्रुपमधील बॉम्बे डाईंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने वरळीमधील जवळपास 22 एकर जमीन गोइसु रिअल्टीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही डील दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे.

Read More

American Apple : अमेरिकन सफरचंद आणि अक्रोडवरील सामान्य सीमा शुल्क कायम, केवळ अतिरिक्त शुल्क रद्द

अमेरिकन सफरचंद आणि अक्रोडच्या आयातीवर वाणिज्य विभाग सीमा शुल्क आकारत असते. सफरचंदावर 50% तर अक्रोडवर 100% मोस्ट फेवर्ड नेशन ड्युटी (Most Favored Nation Duty) आकारली जाते. मात्र अमेरिकेने 2019 साली स्टील आणि ॲल्युमिनियमवरील निर्यात शुल्क वाढवल्यामुळे भारत सरकारने अमेरिकेन सफरचंद आणि अक्रोडवर अतिरिक्त 20% सीमा शुल्क लादले होते.

Read More

Sugarcane farmers : उसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची मागणी; शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

साखर कारखान्यांचा 2022-23 या वर्षीच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना 3050 प्रतिटन या प्रमाणे एफआरपी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सद्य स्थितीत खतांच्या किमती, मजुरांचे रोजगार, इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात आलेला उसाचा दर परवडत नाही.

Read More

Pola Festival : नागपुरात 'तान्हा पोळा' निमित्त कोट्यवधीची उलाढाल; बाजारात अडीच लाखाचा लाकडी नंदीबैल

Tanha Pola 2023 : नागपूर शहरात पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. ही परंपरा वर्षानुवर्षापासून सुरु आहे. तान्हा पोळा या परंपरेस यंदा 217 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने नागपूर शहरात अनेक ठिकाणी लाकडी नंदीबैल विक्रीची दुकाने सजली आहेत. तर यंदा मार्केटमध्ये लाकडी नंदीबैल विक्रीची तीन महिन्यातील उलाढाल ही 5 कोटी पेक्षा अधिक झाली आहे.

Read More

Amazon Indian Festival Sale: ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू

Amazon Indian Festival Sale: येत्या 23 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल' सुरू होत आहे. यामध्ये विविध ब्रँडेड उत्पादनांवर तब्बल 75 टक्के एवढा भरघोस डिस्काउंट देण्यात येत आहे.

Read More