Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Viral Acharya: भारतातील 'या' 5 व्यावसायिक कुटुंबामुळे देशात महागाई वाढली, RBI च्या माजी अधिकाऱ्यांचा दावा

Reserve Bank of India: आर्थिक अडीअडचणीच्या काळात देशातील या 5 कंपन्यांना सरकारने वेळोवेळी आर्थिक सहाय्य पुरविले आहे. परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून सरकारने या कंपन्यांना शक्य तेवढी मदत केली असल्याचे देखील विरल आचार्य यांनी म्हटले आहे.

Read More

Sintex Sale : सिंटेक्स कंपनीची विक्री! कुणी आणि कितीला घेतली कंपनी विकत

Sintex And Welspun Group : सिंटेक्स हे देशभरात प्रसिद्ध नाव आहे. या कंपनीची पाण्याची टाकी बहुतांश घरांच्या छतावर बसवण्यात आली आहे. या कंपनीच्या विक्रीसोबतच कंपनीच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केट सुरु होताच, बीएसईवर 4.74 टक्क्यांच्या वाढीसह 1.99 रुपयांवर व्यवहार सुरु होते. जाणून घ्या सिंटेक्स कोणी विकत घेतला आणि किती किमतीत हा करार झाला.

Read More

SEBI ने PNB Finacne & Industries सह 'या' कंपन्यांना गैरव्यवहारप्रकरणी ठोठावला 36 कोटींचा दंड, जाणून घ्या कारण

SEBI Penalties: सेबीने समीर जैन आणि मीरा जैन यांना 36 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून, सिक्योरीटी बाजारातही त्यांना व्यवहारांची बंदी घातली आहे. याव्यतीरिक्त, समीर जैन आणि मीरा जैन यापुढे कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये व्यवस्थापक पदावर काम करू शकत नाही.

Read More

Virgin Orbit LayOff: बिलेनिअर रिचर्ड ब्रान्सन यांचा व्हर्जिन ग्रुप मंदीच्या संकटात, व्हर्जिन ऑर्बिटमध्ये मोठी नोकर कपात

Virgin Orbit LayOff: जगातील श्रीमंत उद्योजकांच्या पैकी एक ब्रिटीश रिचर्ड ब्रान्सन यांच्या व्हर्जिन समूहाला मंदीचे तडाखे बसले आहेत. ब्नान्सन यांच्या मालकीची व्हर्जिन ऑर्बिट ही कंपनी जवळपास 85% कर्मचारी कामावरुन कमी करणार आहे.व्हर्जिन ऑर्बिट ही जगभरात रॉकेट तयार करणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.कंपनीने तडकाफडकी नोकर कपातीची घोषणा केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये व्हर्जिन ऑर्बिटच्या शेअरमध्ये

Read More

IPL Title Sponsorship: DLF पासून Tata Group, 2008 पासून IPL टायटल स्पॉन्सरशीप 16 पटीने वाढली

DLF To TATA: देशभरात असंख्य लोक आयपीएल या स्पर्धेच्या प्रत्येक हंगामाची आतुरतेने वाट बघत असतात. तिकिटे, स्पॉन्सरशीप व थेट प्रक्षेपणातून बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. वर्षभरापूर्वी स्पर्धेचे मुख्य प्रायोजक टायटल स्पॉन्सरशीप टाटा समूहाने सर्वाधिक 670 कोटी रुपयांची बोली लावत जिंकली. 2008 ते 2023 या दरम्यान या स्पॉन्सरशीपसाठी संबंधित समूहांना किती पैसे मोजावे लागले हे जाणून घेऊया.

Read More

G20 In Mumbai : द्विपक्षीय व्यापारातील अडथळे दूर करण्यावर जी-20 देशांचे एकमत, मुंबईत जी-20 देशांची बैठक संपन्न

G20 In Mumbai : भारत जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाठपुरावा करत असलेल्या जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रमांवर चर्चा झाली. व्यापार वृद्धी आणि समृद्धीसाठी आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी (GVCs) तयार करणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) एकीकरण करणे, कार्यक्षम लॉजिस्टिक तयार करण्याबाबत विविध देशांच्या प्रतिनिधींनी आपले मत नोंदवले.

Read More

Tata Group's Air India : सरकारच्या पैशानंच फेडणार सरकारचं कर्ज, एअर इंडियासाठी टाटाचा काय प्लॅन?

Tata Group : सरकारचं कर्ज सरकारच्याच पैशानं फेडण्याची योजना टाटा समुहानं आखलीय. टाटा ग्रुप आणि एअर इंडिया यांच्यात मागच्या वर्षी करार झाला होता. गेल्या वर्षीच्या जानेवारीत एअर इंडियाला 18,000 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार टाटा समुहानं केला होता. मात्र त्यावेळी जो कर्जाचा बोजा टाटा समुहावर पडला, ते कर्ज फेडण्यासाठीचा प्लॅन कंपनीनं आखलाय.

Read More

Airbus Aircraft : टाटांना मिळाले एअरबस विमानांवर 'मेक इन इंडिया' दरवाजे बसवण्याचे कंत्राट

Make In India : टाटा कंपनी निर्मित दरवाजे आता एअरबस विमानात बसवले जाणार आहेत. हे 'मेड इन इंडिया' दरवाजे टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड म्हणजेच TASL द्वारे बनवले जातील. यासाठी एअरबस आणि टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला आहे. TASL त्यांच्या हैदराबाद येथील अत्याधुनिक कारखान्यात हे दरवाजे तयार करेल.

Read More

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या संपत्तीत भर, श्रीमंतांच्या यादीत 21 व्या स्थानावर झेप!

Gautam Adani Net Worth: नुकत्याच प्रकाशित झालेल्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार गौतम अदानी आता श्रीमंतांच्या यादीत टॉप 20 च्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात दीड अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.

Read More

Top Selling Car brand : NEXA ठरला भारतातील चौथा सर्वात मोठा कार ब्रँड; सुझुकीचा नवा प्रीमियम चेहरा

Maruti NEXA: मारुतीच्या बलेनो, ग्रँड विटारा सारख्या प्रीमियम कार्सची विक्री करून नेक्सा (NEXA) हा भारतातील चौथा सर्वात मोठा कार ब्रँड ठरला आहे. 2024 मध्ये कंपनी भारताच्या कार बाजाराचे चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मारुती सुझुकीच्या प्रीमियम कार्सचा विक्री करणारा स्वतंत्र ब्रँड नेक्सा'चा सुझुकीच्या एकूण विक्रीत 22.5 इतका वाटा आहे.

Read More

Alibaba : बाजारपेठेत वर्चस्व मिळवण्यासाठी अलिबाबाचं 'या' सहा व्यवसायात विभाजन

Alibaba Group : बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी असलेली अलिबाबा आपल्या सर्वांना माहीत आहेत. चीनमध्ये (China) स्थापन झालेल्या या कंपनीचा विस्तार आता जगभर झालाय. ई-कॉमर्स, तंत्रज्ञान एवढ्यापुरतं या कंपनीचं अस्तित्व नाही, तर विविध व्यवसायात उडी घेऊन त्यात यशही मिळवलंय. अलिकडेच या कंपनीचं विभाजन झालंय. सहा वेगवेगळ्या व्यवसायात हे विभाजन झालंय.

Read More

VI Facing Challenges In India: एकेकाळी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होती वोडाफोन, आता मोजतेय शेवटच्या घटका!

Vodafone Idia: देशातील तिसरी आणि जगातील 11वी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाला (VI) आपला उद्योग बंद करावा लागू शकतो. ग्राहकांची संख्या सतत कमी होत आहे आणि कर्ज वाढत आहे. एकेकाळी ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होती. रिलायन्स जिओने (Jio) टेलिकॉम बाजारात प्रवेश केल्यानंतर वोडाफोनल कंपनीला उतरती कळा लागली.

Read More