Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

G20 In Mumbai : द्विपक्षीय व्यापारातील अडथळे दूर करण्यावर जी-20 देशांचे एकमत, मुंबईत जी-20 देशांची बैठक संपन्न

G20

Image Source : www.twitter.com (@g20org)

G20 In Mumbai : भारत जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाठपुरावा करत असलेल्या जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रमांवर चर्चा झाली. व्यापार वृद्धी आणि समृद्धीसाठी आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी (GVCs) तयार करणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) एकीकरण करणे, कार्यक्षम लॉजिस्टिक तयार करण्याबाबत विविध देशांच्या प्रतिनिधींनी आपले मत नोंदवले.

भारत जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाठपुरावा करत असलेल्या जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रमांवर चर्चा झाली. व्यापार वृद्धी आणि समृद्धीसाठी आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी (GVCs) तयार करणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) एकीकरण करणे, कार्यक्षम लॉजिस्टिक तयार करण्याबाबत विविध देशांच्या प्रतिनिधींनी आपले मत नोंदवले. मुंबईतील पहिली G20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकीला  वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी संबोधित केले. मुंबईत G20 सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.   

सध्याची भू- राजकीय स्थिती  आणि जागतिक पातळीवरील चिंताजनक आर्थिक वातावरणात भारताने जी-20 अध्यक्षपद स्वीकारले आहे. 2023 हे भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष असल्याने सरकारने एक मध्यम मार्ग शोधत भारताला आपले प्राचीन ज्ञान  जगासोबत सामायिक  करण्याची ही योग्य वेळ आहे, असे गोयल यांनी नमूद केले. "एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य"  प्रत्यक्षात आणण्यासाठी  या प्राचीन ज्ञानाची  प्रगत तंत्रज्ञानासह सांगड घातली जाऊ शकते. सर्वसमावेशक विकासासाठी  प्रत्यक्ष  फलनिष्पत्तीच्या दृष्टीने, व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची  महत्त्वाची भूमिका असून  केवळ जी 20 सदस्य देशांमध्येच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साउथमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी ही भूमिका  सहाय्य्यकारी ठरेल, असा पुनरुच्चार पियूष गोयल यांनी केला.

बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या G-20 सदस्य देशांच्या प्रस्तावाला गोयल यांनी पाठिंबा दिला. यावर्षीचे जी 20 चिन्ह असलेल्या कमळापासून व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाच्या प्रतिनिधींनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन गोयल यांनी केले. चिखलातही निर्मळपणे फुलण्याच्या क्षमतेसाठी कमळाला जगभरात आदराचे स्थान आहे असे सांगत या अस्थिर आर्थिक काळात  सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी आपण एकत्रितपणे उपाय शोधू शकतो, असे ते म्हणाले.

या बैठकीत सदस्य देशांनी, सध्या असलेल्या मूल्य साखळीविविधता आणण्याची गरज अधोरेखित केली तसेच, सर्वांगीण आर्थिक वाढीसाठी विकसनशील देश आणि एलडीसी मधील कंपन्यांच्या सहभागाला गती देण्याच्या गरजेवरही भर देण्यात आला. एमएसएमई उद्योगांसाठी माहिती आणि वित्तपुरवठा सुलभ करण्याच्या गरजेवर चर्चा झाली. अनेक देशांनी एमएसएमई उद्योगांना असणारे डिजिटल प्रवेशाचे अडथळे दूर करण्यासाठी आणि डिजिटल व्यापारी प्लॅटफॉर्मशी त्यांना जोडून घेता यावे यासाठी गांभीर्याने आढावा घेण्याचे ठरवण्यात आले.या बैठकीनंतर केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बरतवाल म्हणाले की वस्तू आणि सेवांचा स्थानिक पुरवठ्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक महत्वाचे साधन आहे. जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीत येणारी आव्हाने एकत्रितरित्या समजून घेण्याचे सामर्थ्य अधिक वाढवणे, हे भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे उद्दिष्ट असल्याचे बरतवाल यांनी सांगितले.