Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Group's Air India : सरकारच्या पैशानंच फेडणार सरकारचं कर्ज, एअर इंडियासाठी टाटाचा काय प्लॅन?

Tata Group's Air India : सरकारच्या पैशानंच फेडणार सरकारचं कर्ज, एअर इंडियासाठी टाटाचा काय प्लॅन?

Tata Group : सरकारचं कर्ज सरकारच्याच पैशानं फेडण्याची योजना टाटा समुहानं आखलीय. टाटा ग्रुप आणि एअर इंडिया यांच्यात मागच्या वर्षी करार झाला होता. गेल्या वर्षीच्या जानेवारीत एअर इंडियाला 18,000 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार टाटा समुहानं केला होता. मात्र त्यावेळी जो कर्जाचा बोजा टाटा समुहावर पडला, ते कर्ज फेडण्यासाठीचा प्लॅन कंपनीनं आखलाय.

15,000 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचा बोजा

टाटा ग्रुपनं (Tata group) एअर इंडियासोबत डील केली. या भागीदारीसोबतच एअर इंडियावर 15,000 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचा बोजा पडला होता. एअर इंडियावर (Air India) कर्जाचा बोजा वाढलेला होता, मात्र त्यावेळी ते सरकारच्या नियंत्रणात होते. एअर इंडियाचं कर्ज हे सरकारी होतं. त्यानंतर आता हे कर्ज फेडण्यासाठी टाटा समुहानं पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. हे कर्ज फेडण्यासाठी टाटा समुहानं सरकारी पैशाची व्यवस्था केलीय. मिंटनं यासंबंधीचं वृत्त दिलंय.

बँकांकडून निधी उभारण्यास सुरुवात

कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून निधी उभारण्यास सुरुवात झालीय. या अंतर्गत एअर इंडियानं स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BoB) यांच्याकडून 14,000 कोटी रुपयांचा निधी उभारलाय. काही जुन्या कर्जांचं पुनर्गठन यामध्ये आहेत. तर काही नवीन कर्जेदेखील समाविष्ट आहेत. मिंटनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या एका अहवालात म्हटलं आहे, की एअर इंडियानं 14,000 कोटी रुपयांचं कर्ज प्राप्त केलं आहे. या 14,000 कोटी रुपयांपैकी 12,500 कोटी रुपये हे सध्याच्या कर्जाचं पुनर्गठन करत आहेत.  इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) ही कोविडच्या काळात सुरू करण्यात आली होती. या ईसीएलजीएसमधून 1500 कोटी रुपये उभारण्यात आले आहेत.

अधिक व्याजदरानं मिळालं कर्ज

एअर इंडियाला जे कर्ज मिळालंय, ते अधिक व्याजदरानं. जवळपास 0.5 टक्के अधिकचा हा दर आहे. एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाकडून हे कर्ज एसबीआयच्या सहा महिन्यांच्या कर्जाच्या व्याजदरापेक्षा (Marginal cost of funds based lending rate) 0.5 टक्के अधिक आहे. एसबीआयच्या सहा महिन्यांच्या कर्जावरचा सध्याचा एमसीएलआर 8.4 टक्के आहे. कोरोनाच्या काळात लहान दुकानदार आणि व्यावसायिकांना मदत करण्याच्या हेतूनं सरकारनं क्रेडिट लाइन हमी योजना सुरू केली होती. हमी या शब्दावरूनच लक्षात येतं, की सरकारकडून हमी मिळणार आहे. म्हणजेच कर्ज बुडाल्यास सरकारकडून ही हमी मिळणार. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या विविध क्षेत्रांमध्ये नंतर ही योजना विस्तारित करण्यात आली. टाटा समुहानंदेखील याच योजनेअंतर्ग एअर इंडियासाठी 1500 कोटी रुपये उभारले आहेत.

कर्ज तरीही विस्तार

एअर इंडिया सध्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. आपलं वाढलेलं कर्ज फेडण्यासाठी एअर इंडिया एसबीआय, बँक ऑफ बडोदा अशा  सरकारी बँकांकडून कर्जे उचलत आहे. मात्र तरीदेखील एअर इंडियानं आपला विस्तार करायचं ठरवलंय. 470 नवीन विमान एअर इंडिया खरेदी करणार आहे. एअरबस आणि बोईंगला यासंबंधीचे आदेशही कंपनीनं दिलेत. याची किंमत जवळपास 5.5 कोटी रुपये आहे. कंपनी एवढ्यावरच थांबली नाही, तर एअर इंडियाची नव्यानं पुनर्रचना टाटा समूह करीत आहे. विस्तारा आणि एअर एशिया हे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये विलीन होणार आहेत.

स्वेच्छा निवृत्तीची योजना

एअर इंडियानं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना (Voluntary Retirement Scheme) सुरू केलीय. या योजनेचा सुमारे 2000 कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. कंपनीला 200 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. विस्तार करायचा असेल तर नवीन केबिन क्रू आणि वैमानिकाची नियुक्ती एअर इंडियाला करणं आवश्यक आहे. सध्या कंपनीत 1,000 कर्मचारी काम करतात.