सेबीने समीर जैन आणि मीरा जैन या दांपत्यावर कारवाई करताना 35 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच शेअर बाजारात व्यवहार करण्यावरही त्यांना बंदी घालण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, समीर जैन आणि मीरा जैन यापुढे कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये व्यवस्थापक पदावर काम करू शकणार नाहीत.
भांडवली बाजार नियामक संस्था अर्थात, SEBI (भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड) ने PMB Finance and Industries Limited, Camac Commercial Company Ltd आणि इतर कंपन्यांवर एकूण 35.67 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने समीर जैन आणि मीरा जैन यांनाही दंड ठोठावला असून, त्यांना सिक्युरिटीज बाजारातूनही बंदी घातली आहे. बाजार बंदीच्या व्यतिरिक्त, समीर जैन आणि मीरा जैन यापुढे कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करू शकत नाही. पुढे, SEBI ने दुसर्या एका आदेशात असे म्हटले आहे की जोपर्यंत दोन्ही कंपन्या SEBI च्या नियमांची पूर्तता करत नाही तोपर्यंत ही बंदी कायम असणार आहे.
बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड (BCCL) चे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष समीर जैन होते आणि त्या वेळी मीरा जैन या कंपनीच्या पूर्णवेळ संचालिका होत्या.
सेबीने सहा कंपन्यांवर घातली बंदी
PNB Finance and Industries Ltd (PNBFIL) च्या प्रकरणात, 6 कंपन्यांना शेअर बाजारातून बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये समीर जैन, मीरा जैन, अशोका विनियोग लिमिटेड, आरती विनियोग लिमिटेड, कॅमॅक कमर्शियल कंपनी लिमिटेड आणि कंबाईन होल्डिंग लिमिटेड यांचा समावेश आहे. यासाठी सेबीने 96 पानांचे आदेश पत्र जारी केले आहे. शिवाय पीएनबीएफआयएलला 12 कोटी रुपये, समीर आणि मीरा जैन आणि अशोका विनियोग लि., आर्टी विनियोगा लिमिटेड, कॅमॅक कमर्शियल कंपनी लिमिटेड आणि कंबाईन होल्डिंग लिमिटेडवर 1.42 कोटी रुपये आणि त्रिशाला जैन यांना ३९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे